Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘तारक मेहता’ तील अभिनेत्रीने निर्मात्यांवर लावला लैंगिक छळाचा आरोप

मुंबई प्रतिनिधी- 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका जवळपास 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. या मालिक

सा. बा. मंत्री अशोक चव्हाणांची बदनामी ! l LokNews24
मध्यप्रदेशमध्ये 2 मालगाड्यांची समोरासमोर धडक
नगरच्या बिग्मीद्वारे तब्बल 100 कोटींची फसवणूक; एसआयटी चौकशीची ठेवीदारांची मागणी

मुंबई प्रतिनिधी- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका जवळपास 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. या मालिकेतील प्रत्येकातील कलाकारांचेही लाखो चाहते आहेत. आता मालिकेत टप्पू आणि सोनूची लव्ह स्टोरी दाखवण्यात येत आहे. त्यावरून जेठालाल आणि भिडे एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दरम्यान, या मालिकेत रोशन सिंग सोढीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसावीलनं मालिकेला रामराम केला आहे. इतकंच नाही तर तिनं मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. जेनिफरमिस्त्री बंसीवालनं दोन महिन्यांपूर्वीच मालिकेसाठी शूट करणं बंद केलं आहे. तिनं असं देखील सांगितलं तिचा शूटिंगचा शेवटचा दिवस हा 6 मार्च होता. मालिकेच्या सेटवर प्रोजेक्ट हेड सोहेल आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांनी तिचा अपमान केला. ही माहिती मिळाल्यानंतर जेनिफरशी संपर्क साधला आणि त्यावर प्रतिक्रिया देत जेनिफर म्हणाली, ‘हो, मी मालिका सोडली. मी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी माझं शेवटचं शूट हे 6 मार्च रोजी केलं होते. मला सेटवरून जायचं होतं. तर त्याचवेळी सोहेल आणि मालिकेचे कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांनी अपमान केला.’ तिच्या शेवटच्या दिवसाविषयी थेट स्पष्ट विचारणयात येताच जेनिफर म्हणाली, ‘7 मार्च रोजी माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आणि होळी होती. मला सोहेल आणि जतिन यांनी चार वेळा सेडवरून जाण्यास सांगितले. मागे उभं राहून माझ्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मला सेटवरून बाहेर जाऊ दिले नाही. मी त्याला सांगितलं की मी मालिकेच 15 वर्षे काम केलं आहे आणि मला जबरदस्ती करून थांबवू शकत नाही आणि जेव्हा मी जाऊ लागले तेव्हा त्यानं मला धमकी दिली. त्यानंतर मी असित कुमार मोदी, सोहेल रमानी आणि जतिन बजाज यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली.

COMMENTS