Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

समृद्धीवर भीषण अपघात १ ठार, तीन जखमी

वाशीम प्रतिनिधी - सध्या घरोघरी गणपतीची स्थापना झाली आहे. गौरी गणपतीसाठी लोक आपल्या गावाकडे जायला निघतात.गावाकडे गौरी गणपतीसाठी निघालेल्या कु

दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू
परभणीत भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
गरोदर महिलेच्या अंगावरून गेला उसाची ट्रैक्टर ट्रॉली

वाशीम प्रतिनिधी – सध्या घरोघरी गणपतीची स्थापना झाली आहे. गौरी गणपतीसाठी लोक आपल्या गावाकडे जायला निघतात.गावाकडे गौरी गणपतीसाठी निघालेल्या कुटुंबाचा समृद्धी महामार्गावर एका वन्य प्राण्याला धडकून अपघात झाला असून या अपघातात एक ठार तर तिघे जखमी झाले आहे. गौरी गणपतीसाठी पुण्यात राहणारे दुरतकर कुटुंब अमरावती जाण्यासाठी काल सकाळी निघाले असता संध्याकाळी वाशीम जवळ वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 196 भागात त्यांच्या वाहनापुढे अचानक एक वन्य प्राणी आला  आणि वाहनाला त्याची जोरदार धडक बसली.त्यांचे वाहन पालटले आणि महामार्गावर जाऊन पडले. या अपघातात कुटुंबातील एकाच जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले.  

अपघाताची माहिती मिळतातच स्थानिकांनी घटनास्थळी पोहोंचुन कुटुंबातील लोकांना वाहनातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या महामार्गावर अनेकदा वन्य प्राणी येतात. त्यांना धडकून अपघात होतात.तर अनेकदा वन्य प्राणी देखील मृत्युमुखी होतात. 

COMMENTS