Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आज कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन 

नंदुरबार प्रतिनिधी - जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून राज्यातील 18 लाख कर्मचारी बेमुदत संपावर बसले आहेत .नंदु

कृषीकन्या विशाखा उघडे हिने साधला शेतकऱ्यांशी संवाद
मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी 
पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढणार ः संजय राऊत

नंदुरबार प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून राज्यातील 18 लाख कर्मचारी बेमुदत संपावर बसले आहेत .नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास 17 हजार कर्मचारी या उपोषणात सहभागी झाले आहेत. शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सात दिवसापासून कर्मचारी आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत उपोषण असेच सुरू राहील, असे कर्मचारी संघटने कडून वारंवार सांगण्यात येत आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज नंदुरबारात थाळीनाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. नंदुरबार पंचायत समिती आवारात झालेल्या आंदोलनात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, तहसील कर्मचारी यासह अनेक संघटनाचे कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी महिला व पुरुषांनी थाळी वाजवून निदर्शने केली. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील व यापुढे अधिक तीव्र करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात महिला व पुरुषांची संख्या लक्षणीय होती.

COMMENTS