Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय कर्मचाऱ्यांचे तहसील कार्यालयाबाहेर थाळी नाद आंदोलन

बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावर उतरून महसूल, शिक्षण

पुणे जिल्ह्यातील चार खेळाडूंना सरकारी नोकरी
दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचे संकेत
राहुरी विधानसभा डॉ. सुजय विखे लढणार ?

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावर उतरून महसूल, शिक्षण आणि शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी थाळी नाद आंदोलन केले. आष्टी तहसील कार्यालयाबाहेर देखील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थाळी नाद आंदोलन केले आहे. जुनी पेन्शन लागू करा अशी आग्रही मागणी शिक्षकांनी केली आहे. तहसील कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग घेतला असून जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा या शिक्षकांनी घेतला आहे.

COMMENTS