Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राम्हणगांव ते रवंदा रस्त्यावरील बाभळीच्या काट्या काढण्याची ठाकरे गटाची मागणी

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगांव ते रवंदा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात काट्या वाढलेल्या दिसत आहे. त्यामुळे या रस्त्यालगत असलेल्या काट

भंडारदर्‍याच्या निसर्गसौंदर्याचा लुटला आनंद…;पर्यटकांचा आनंदोत्सव बहरला, रंधा परिसरात गर्दी
पहाटेचा थरार…शस्त्राने वार करून अडीच लाखाची चेन लांबविली
बेकायदेशीर काम बंद…मनपा कापणार कर्मचार्‍यांचा पगार

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगांव ते रवंदा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात काट्या वाढलेल्या दिसत आहे. त्यामुळे या रस्त्यालगत असलेल्या काट्या व बाभळी लवकरात लवकर काढून घेण्याची मागणी कोपरगाव शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोपरगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गौरव सोनवणे यांना निवेदन देत केली आहे.
कोपरगाव शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक सचिन आसने व सुनिल माकूने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ब्राम्हणगांव रवंदा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात काट्या बाभळी वाढलमुळे आहे त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना शेतकरी,विद्यार्थी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात देखील झाले आहे. त्यामुळे यातून भविष्यात काही मोठा अनर्थ होऊ नये या दृष्टीने वेळीच उपयोजना करत या रस्त्याच्या कडेला वाढलेल्या काट्या बाभळी तात्काळ काढुन घेण्यात याव्यात अशी विनंती शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास कोपरगाव याना निवेदन देत केली आहे.

COMMENTS