Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील दहशतवादाचा कट उधळला

संशयित दहशतवादी अखेर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेला एक संशयित दहशतवादी मुंबईत फिरत असल्याची माहिती इशारा राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिली होती. यामुळे खळबळ उडा

‘अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करा’ I LOKNews24
ना. जयंत पाटील-आनंदराव रमजान ईद निमित्त एकत्र; राजकीय चर्चेला उधाण : तर…शिवसेनेचा नगराध्यक्ष?
 बोरी गोसावीत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पॅनलचे वर्चस्व, विरोधकांना चारही मुंड्या केले चीत 

मुंबई : पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेला एक संशयित दहशतवादी मुंबईत फिरत असल्याची माहिती इशारा राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिली होती. यामुळे खळबळ उडाली होती. तपास यंत्रणा देखील हायअलर्ट मोडवर होत्या. दरम्यान, या संशयित दहशत वाद्याचा शोध तपास यंत्रणा करत होत्या. त्याला अटक करण्यात यश आले आहे.
सरफराज मेमन असे अटक करण्यात आलेला संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. सरफरायज मेमन हा पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आला होता. तो मुंबईत फिरत होता. दरम्यान, मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा देण्यात आला होता. या बाबतची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिली आहे. मुंबई पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना दिली होती. त्यानुसार सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर राहून त्याचा शोध घेत होते. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या महितीनुसार इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला अटक केली आहे. सरफराजच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस पथक देखील इंदूरमध्ये गेले आहेत. सरफराज हा चीन आणि पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन भारतात आला होता. त्याला मुंबईत दहशतवादी हल्ला करायचा होता. यामुळे सर्व यंत्रणांना हायअलर्ट मोडवर ठेवण्यात आले होते. या बाबतच ई-मेल मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला होता. एनआयएचे पथक आणि पोलिस यंत्रणा आणि इतर तपास यंत्रणाकडून मेननच्या शोध सुरू होता.

COMMENTS