Homeताज्या बातम्यादेश

 मनोरुग्ण पतीचे भयंकर कृत्य

शिर हातात घेऊन मंदिरावर जाऊन बसला

 पूर्णा  प्रतिनिधी - पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे पतीने पत्नीचे शीर कोयत्याने तोडून धडावेगळे केल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री नऊच्या

जुन्या नव्या पाण्याच्या टाकी संदर्भात चुकीची माहिती देऊन विपर्यास : नवले, साळवी, खंडागळे यांचा खुलासा
महिलांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न : ना. अ‍ॅड. यशोमती ठाकूर
निवडणूक आयोग नरमला !

 पूर्णा  प्रतिनिधी – पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे पतीने पत्नीचे शीर कोयत्याने तोडून धडावेगळे केल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे. सदर मयत महिला ही दोन मुली व एक मुलगा यासह कमलापूर येथे  राहत होती. मंगळवारी  रात्री अचानक नऊच्या दरम्यान आशा केशव मोरे (वय 36) यांचे पती केशव गोविंद मोरे याने रात्रीच्या ९च्या दरम्यान अचानक घरात येऊन कोयत्याने वार केले. या दरम्‍यान आशा मोरे यांचे शीर धडावेगळे करून ते शिर गावातील हनुमान मंदिराजवळ जाऊन ओट्यावर बसला होता. केशव गोविंद मोरे हा काही महिन्यांपासून मनोरुग्ण असल्याचेही कळाले आहे. त्याने अनेक वेळा गावातील व गाव शेजारील अनेकांना त्रास दिला आह़े. या घटनेबद्दल ताडकळस पोलीस स्टेशन येथे व्‍यंकटी गोविंदराव मोरे यांनी फिर्यादी दिली असून गुन्‍हा दाखल केला आहे.

COMMENTS