दहावीचा निकाल 96.94 टक्के

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीचा निकाल 96.94 टक्के

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर झाला. यात

नौदलाच्या नव्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छटा
जिल्ह्यात मनरेगा योजनेतून रेशीम उद्योगास प्रोत्साहन
किरीट सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता | DAINIK LOKMNTHAN

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर झाला. यात 96.94 टक्के विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. निकाताल मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. स्टेट बोर्डाच्या 9 विभागांपैकी निकालात कोकण विभाग 99.27 टक्क्यांसह अव्वल असून नाशिक विभाग 95.90 टक्क्यांसह तळाशी गेलाय.
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या 9 विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (99.27 टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (95.90 टक्के) विभागाचा लागला आहे. यंदा राज्यातून एकूण 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

COMMENTS