नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश असलेला चीन नेहमीच कुरघोडी करतांना दिसून आला आहे. शिवाय चीनने सातत्याने आपली महत्वाकांक्षा जागृत करत आपला विस्तार
नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश असलेला चीन नेहमीच कुरघोडी करतांना दिसून आला आहे. शिवाय चीनने सातत्याने आपली महत्वाकांक्षा जागृत करत आपला विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे अरूणाचलप्रदेश, लडाखसारख्या भागात चीन आपल्या चौक्या तयार करून आपली ताकद सीमाभागात वाढवतांना दिसून येत होता. मात्र दोन्ही देशांदरम्यान नुकत्याच झालेल्या करारानुसार भारत-चीन सीमारेषेवरील तणाव निवळतांना दिसून येत आहे. कारण दोन्ही देशांच्या सैनिकांनी पूर्व लडाख सेक्टरमधून माघार घेण्यास सुरूवात केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना संरक्षण अधिकारी म्हणाले की, पूर्व लडाख सेक्टरमधील डेमचोक आणि देपसांग पठारावर दोन ठिकाणी चीनी सैन्य मागे हटत आहे. ते म्हणाले की, भारतीय लष्कराने देखील या भागात तैनात करण्यात आलेले लष्करी साहित्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. जून 2020 मध्ये गलवान खोर्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही आशियाई देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले होते. या करारामुळे भारत आणि चीनच्या सीमेवरील संघर्ष निवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या साठी रशियाने मोठी भूमिका बजावली आहे. भारत चीन सीमेवरील वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य माघारी घेण्याबाबत सूत्रांनी सांगितले की, यासाठी मोठा वेळ लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारत चीन दरम्यान शांतता कराराची घोषणा होताच सैन्य माघारीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
भारत-चीन करार नेमका काय आहे?
पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर एप्रिल 2020 मध्ये पूर्वस्थिती पूर्ववत करण्यास चीन आणि भारत सहमत झाले आहेत. याचा अर्थ आता चीनी सैन्याने ज्या भागात अतिक्रमण केले होते तेथून माघार घेणार आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिसरी यांनी सोमवारी सांगितले की, भारत आणि चीनच्या सीमावर्ती भागात गस्त घालून 2020 नंतर उद्भवणार्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दोन्ही देश यावर पावले उचलतील.
COMMENTS