Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितकडून विधानसभेसाठी दहा उमेदवार जाहीर

काँगे्रसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांचा वंचिमध्ये प्रवेश

मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतांनाच वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवार

कवठेत ड्रोनव्दारे औषध फवारणी ; ग्रामीण शेतकर्‍यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
दापोलीला छावणीचे स्वरुप, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
विरोधी सत्तेत असताना प्लॅंचेट, आता जोतिष ! 

मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतांनाच वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे 10 ही जागांवर मुस्लिम उमेदवार देण्यात आले आहेत.
अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. खतीब हे प्रदेश काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार आणि पक्षाचे माजी उपाध्यक्ष राहिले आहे. गेल्या साठ वर्षांपासून बाळापुर नगरपालिकेवर खतीब घराण्याची सत्ता राहिली आहे. तर 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे खतीब आणि त्यांच्या पत्नीचा अतिशय अत्यल्प मतांनी पराभव झाला होता. बाळापूर मतदारसंघ हा महाविकास आघाडीत नितीन देशमुख यांच्या वाट्याला जाणार असल्याची शक्यता आहे. अशातच त्या अनुषंगाने खतिबांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरली असल्याचेही बोलले जात आहे. खतीब यांच्या वंचित मधील प्रवेशाने बाळापुर मधील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. तर खतीब यांच्या काँग्रेस सोडण्याने अकोल्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

वंचितच्या 10 उमेदवारांची नावे
मलकापूर – शहजाद खान सलीम खान
बाळापूर – खतीब सैयद नतीकुद्दीन
परभणी – सैयद साहेबजान
औरंगाबाद सेंन्ट्रल – जावेद कुरेशी
गंगापूर – सैय्यद गुलाम नबी सय्यद
कल्याण पश्‍चिम – अयाज मौलवी
हडपसर – अ‍ॅड. मोहम्मद मुल्ला
माण – इम्तियाज नदाफ
शिरोळ – आरीफ पटेल
सांगली – अल्लोद्दीन काझी

COMMENTS