संगमनेर ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व त्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विविध उपक्रमांचे
संगमनेर ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व त्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन होत असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांच्या सहकार्याने झालेल्या तीन दिवसीय टेक फेस्टमध्ये 480 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील ऑटोमेशन अँड रोबोटिक्स विभागाच्या वतीने एक्स कॅलिबर 2024 हा एक टेक्निकल फेस्ट राबविण्यात आला. यावेळी उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, नाशिकच्या जनरल मॅनेजर सुब्रता मोंडल, श्रीकांत पाटील ,डेप्युटी जनरल मॅनेजर प्रशांत देशमुख, एक्स कॅलिबर कंपनीचे प्रमोद वाघ, ओंकार सावळेकर, सॅमसंगचे अजिंक्य जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश विभाग प्रमुख डॉ विलास शिंदे आदीं उपस्थित होते. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स विभागाच्या वतीने झालेल्या या टेक्निकल फेस्टमध्ये 480 स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यामधून रोबोवर, ड्रोन रेसिंग, पेपर प्रेझेंटेशन, लाईन फॉलोवर, रोबो प्रोग्रामिंग, लेथ वार, डिजिटल पोस्टर, प्रेसेंटेशन प्रोजेक्ट, प्रदर्शन आणि ई स्पोर्ट्स या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या फेस्टमध्ये रुसहास इंजिनिअरिंग, सॅनसून इंडस्ट्री, फलकोन ऑटोमोशन, बेदारे इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ग्लोबल सॉफ्ट, प्रोफिलिक नंदिनी इंजीनियरिंग यांनी सहभाग घेतला होता. या फेस्ट मधील विजेत्या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, विभागप्रमुख डॉ. विलास शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक हेमंत पठाडे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS