Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड त्यामुळे टिव्ही, फ्रिज सह इलेक्ट्रिक उपकरणं जळाली

कल्याण प्रतिनिधी - कल्याण जवळ असलेल्या मोहने परिसरातील शिवसृष्टी कॉम्प्लेक्समध्ये काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित

संपत्तीच्या गुर्मीतूनच बेधुंदशाही !
कोरोनाची लाट कायम ; दिवसभरात 1206 रुग्णांचा मृत्यू
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी 15 मार्चला बैठक

कल्याण प्रतिनिधी – कल्याण जवळ असलेल्या मोहने परिसरातील शिवसृष्टी कॉम्प्लेक्समध्ये काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला त्यानंतर काही क्षणातच या इमारती मधील काही नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, एसी, पंख्या मधून धूर येऊ लागला. अचानक इलेक्ट्रिक उपकरणामधून धूर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अचानक आलेल्या ओवर होल्टेजमुळे हा प्रकार घडला. या भागाला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने याचा फटका ग्राहकांना बसला. या घटनेत नागरिकांचे टीव्ही फ्रिज एसीसह चार्जिंग लावलेले मोबाईल देखील खराब झालेत. महावितरणची याप्रकरणी चूक असून महावितरणाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली. याबाबत महावितरण चे अधिकारी विजय मोरे यांना संपर्क साधला असता या भागातील ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा प्रकार घडलाय, संबधित इमारतीला पर्यायी व्यवस्था करत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू आहे. झालेल्या नुकसानीबाबत संबंधितांचे अर्ज आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले आहे.

COMMENTS