Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

बारामती परिसरात इमर्जन्सी लँडिंग

पुणे प्रतिनिधी : भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर गुरुवारी पुणे विमानतळावरुन हैद्राबादच्या दिशेने क्षेपावले होते. मात्र, हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक

पाटण तालुक्यात अल्पवयीन मतिमंद मुलीवर 8 जणांचा बलात्कार; संशयित महिलेसह आठजण पोलीस कोठडीत
सरपंचाच्या गाडीवर गोळीबार, सरपंच थोडक्यात बचावले | LOK News 24
खड्ड्यांना हार घालून गांधीगिरी ; युवक काँग्रेसचे आंदोलन

पुणे प्रतिनिधी : भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर गुरुवारी पुणे विमानतळावरुन हैद्राबादच्या दिशेने क्षेपावले होते. मात्र, हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कॅप्टनच्या लक्षात येताच, बारामती परिसरातील माळेगाव येथील खांडज गावातील शेतात विमानाचे इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले.
अचानक मोकळया शेतात लष्कराचे हेलिकॉप्टर उरतल्याने ते पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली. हेलीकॉप्टरमध्ये तीन पुरुष व एक महिला प्रवासी प्रवास करत होते. बारामती तालुक्यातील खांडज गावाचे परिसरात हेलिकॉप्टर आल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचे हेलिकॉप्टर चालकाच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी मोकळे शेत पाहून सुरक्षितरित्या हेलिकॉप्टर अलगदपणे शेतात उतरवले. परंतु अचानक भारतीय वायुदलाचे चेतक हेलिकॉप्टर शेतात उतरल्याचे पाहताच खळबळ उडून नागरिकांनी गर्दी केली. माळेगाव पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, ते घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी योग्य तो बंदोबस्त लावला. यासंर्दभातील माहिती होताच, भारतीय वायुदलाचे अधिकारीही घटनास्थळी दुसर्‍या हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यांनी तांत्रिक बिघाड झालेल्या हेलिकॉप्टरची दुरुस्ती सुरू केली असून, हेलिकॉप्टरमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर ते सोलापूरच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, भारतीय वायुदलाचे प्रवक्ते विंग कमांडर अशिष मोघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायु दलाचे चेतक हेलिकॉप्टर हे तांत्रिक बिघाडामुळे बारामती येथे इर्मजन्सी लँडिंगने उतरविण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमधील व्यक्ती आणि हेलिकॉप्टर सुरक्षित असून हेलिकॉप्टरची दुरुस्ती करण्यात येत आहे.

COMMENTS