भिंगार छावणी हद्दीतील कर आकारणी सुरूच राहणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिंगार छावणी हद्दीतील कर आकारणी सुरूच राहणार

अहमदनगर/प्रतिनिधी : देशातील कॅन्टोन्मेंट परिसरात वाहन शुल्क वसुली बंद झाली असली तरी नगरच्या भिंगार कॅन्टोन्मेंट (छावणी) हद्दीत मात्र कर आकारणी सुरूच

चाळीस हजारांची लाच घेतांना महिला सरपंचासह पतीस अटक
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी खा. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल
संजय अमोलिक यांचा अध्यापन कार्यगौरव पुरस्काराने गौरव

अहमदनगर/प्रतिनिधी : देशातील कॅन्टोन्मेंट परिसरात वाहन शुल्क वसुली बंद झाली असली तरी नगरच्या भिंगार कॅन्टोन्मेंट (छावणी) हद्दीत मात्र कर आकारणी सुरूच आहे व ती सुरूच राहणार असल्याचेही स्पष्ट केले गेले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतून प्रवास करणार्‍या व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्क आकारणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी वाहन शुल्क (फी) आकारणार्‍या देशातील कॅन्टोन्मेट बोर्ड हद्दीत सुरू झाली आहे. मात्र, भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीत प्रवेश कर (टॅक्स) आकारला जात असल्याने हा आदेश याठिकाणी लागू होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
संरक्षण मालमत्ता विभागाचे सहाय्यक महासंचालक (कॅन्टोन्मेंट) दमण सिंग यांनी याबाबतचे पत्र संबंधितांना पाठविले आहे. कॅन्टोन्मेंट कायदा 2006 नुसार वाहन प्रवेश शुल्क आकारणी केली जात होती. जीएसटी लागू झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून एलबीटीसह वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्यात आली आहे. या भागातून व्यावसायिक वाहनांकडून 20 ते 70 रुपये प्रवेश शुल्काची आकारणी केली जात होती. मात्र, संरक्षण मालमत्ता विभागाने वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुणे, खडकी, देहूरोड या कॅन्टोन्मेंट बोर्डासह अन्य ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. पण, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे वाहन प्रवेश शुल्क नसून वाहन कराची आकारणी केली जाते. त्यामुळे भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीत ही वाहन कर आकारणी सुरूच राहणार आहे.

COMMENTS