Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवतारेंनी दंड थोपटल्यानंतर तटकरेंचा संताप

मुंबई ः माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती कुणाचा सातबारा नसल्याचे वक्तव्य करत बारामती लोकसभेसाठी दंड थोपटले होते. या वक्तव्याचा निषेध राष्ट्

त्या 16 आमदारांचा फैसला लवकरच
द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; राष्ट्रपतीपदी प्रथमच आदिवासी महिला
दैव बलवत्तर म्हणून प्रवाशांचे प्राण वाचले l पहा LokNews24

मुंबई ः माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती कुणाचा सातबारा नसल्याचे वक्तव्य करत बारामती लोकसभेसाठी दंड थोपटले होते. या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला आहे. काहींना त्यांच्या वक्तव्याचा आनंद झाला असेल, त्यांनी वक्तव्य केले ते चूक आहे, महायुती भक्कम काम करत असताना असे वक्तव्य करणे गैर आहे, असे म्हणत सुनिल तटकरेंनी विजय शिवतारेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

दरम्यान सुनील तटकरे म्हणाले की, नीलेश लंके आणि माझे बोलणे झालेले नाही, बोलणे झाले की सांगतो असे त्यांनी नीलेश लंके शरद पवार गटात जाणार या चर्चांवर बोलताना म्हटले आहे. तर राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वात महायुती भक्कम काम करत असताना शिवतारेंनी असे वक्तव्य करणे गैर आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती करतो की, शिवतारेंच्या वक्तव्याची गंभीर नोंद घ्यावी आणि त्यांना समज द्यावी. मुख्यमंत्र्यांचा निर्णय मानायचा की नाही? हे शिवतारेंच्या हातात आहे. खासदार सुनील तटकरे म्हणाले की, माजी आमदार विजय शिवतारे यांचे वक्तव्य आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. शिवतारेंचे वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. 2019 मध्ये अजित पवारांनी शिवतारेंना आव्हान देत, कसे निवडून येतात ते आता पाहतोच, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवतारेंनी शरद पवारांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता शिवतारेंनी जे वक्तव्य केले, त्याचा काहींना आनंद झाला असेल, पण त्यांना हे माहीत नसेल की, 2019 मध्ये अजित पवारांनी शिवतारेंना जे आव्हान दिले होते, ते शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळेच दिलं होतं. मला असे वाटते की, शिवतारेंनी जे वक्तव्य केले आहे ते अत्यंत चूक आहे. अजित पवार महायुतीत आले तरी विजय शिवतारे आणि अजित पवारांचा संघर्ष कमी व्हायचे नाव घेत नाही. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांवर तोफ डागली. सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या जनतेचा असल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे. तसेच पवार इथे येऊन माफी मागणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत पवार कुटुंबियांवरही त्यांनी निशाणा साधला आहे.

COMMENTS