Homeताज्या बातम्यादेश

टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसला आग; दोन डब्यांत भीषण आग लागून एकाचा मृत्यू

विशाखापत्तनम/अनाकापल्ली : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यातील एलामंचिली रेल्वे स्टेशनाजवळ टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १८१८९) च्या

बस-फॉर्च्युनरच्या टक्करमध्ये ९ जणांचा मृत्यू, ३२ जखमी
आयुष शर्माच्या – AS04’ चित्रपटाचे शुटिंग पूर्ण
अहिल्यानगर : अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाचचे रविवारी उद्घाटन

विशाखापत्तनम/अनाकापल्ली : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यातील एलामंचिली रेल्वे स्टेशनाजवळ टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १८१८९) च्या दोन एसी डब्यांना (बी१ आणि एम२) सोमवारी मध्यरात्री सुमारे १:३० वाजता भीषण आग लागली. या दुर्घटनेत विजयवाड्याचे रहिवासी ७० वर्षीय चंद्रशेखर सुंदर यांचा होरपळून मृत्यू झाला. इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही.लोको पायलटने आग लागताच त्वरित ट्रेन थांबवली, ज्यामुळे डब्यातील सुमारे १५८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढता आले. बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असताना ही घटना घडली. आग पँट्री कारपासून सुरू होऊन लगतच्या डब्यांत पसरली असे प्राथमिक माहिती आहे.आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर खराब झालेले दोन डबे वेगळे करण्यात आले. समलकोट स्टेशनवर नवे दोन एसी डबे जोडून ट्रेन एर्नाकुलमकडे रवाना झाली. प्रभावित प्रवाशांना बसने समलकोटला नेले गेले. विशाखापत्तनम-विजयवाडा मार्गावर काही काळ वाहतूक बंद होती.रेल्वे

अधिकाऱ्यांनी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत:
एलामंचिली: ७८१५९०९३८६
अनाकापल्ली: ७५६९३०५६६९
तुनी: ७८१५९०९४७९
समलकोट: ७३८२६२९९९०
राजमुंद्री: ०८८३-२४२०५४१/४३
एलुरू: ७५६९३०५२६८
विजयवाडा: ०८६६-२५७५१६७

आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तपास सुरू आहे.

COMMENTS