Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी मतदारसंघातील तनपुरेंचा पराभव अनपेक्षित

देवळाली प्रवरा : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या राहुरी विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. शिवाजीराव कर्डिले यांनी अखेर मागिल पराभवाचा वचपा काढ

पाच रुपयांचा मास्क पंधराला, तर दीड हजाराचा पलंग साडेसात हजाराला
डीलरशीप देण्याच्या आमीषाने केली…13 लाखाची फसवणूक
चायना मांजाने कापला पाच वर्षीय मुलीचा गळा

देवळाली प्रवरा : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या राहुरी विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. शिवाजीराव कर्डिले यांनी अखेर मागिल पराभवाचा वचपा काढून प्राजक्त तनपुरे यांचा दारूण पराभव केला. तब्बल 34 हजार 497 मतांनी झालेला तनपुरेंचा पराभव अनपेक्षित ठरल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताच विखे गटाचे, विकास मंडळाचे प्रमुख रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभेत जवळचे काम करणारे सहकारी निघून गेल्यानंतर कर्डिलेंनी चाणाक्ष बुद्धीने राहुरीमध्ये जुन्या भात्यातील डाव या राजकीय मैदानात उतरविले. तनपुरेंचा राहुरीत वाढता वरचष्मा कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाणचे राजूभाऊ शेटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे व भास्कर गाडे यांना त्यांनी स्वतः कडे खेचून आणले. यानंतर विधानसभेसाठी प्रतिस्पर्धी असलेले सत्यजित कदम यांची समजूत काढून दारा आड चर्चा घडवून एकमत केले. विधानसभेचा आखाडा गाजविण्यास प्रारंभ केला. कोणत्याही मोठ्या नेत्यांना राहुरीत न आणता कर्डिलेंनी यशस्वी खेळीचे नियोजन केले. तनपुरे गटाच्या प्रत्येक खेळीला शह देत कर्डिले यांनी निवडणुकीची गुपीत यंत्रणा कामास लावली. तनपुरे गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होत असताना कर्डिलेंनी मात्र मतदार संघातील प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्यास पुढाकार घेतला. कोणत्याही कार्यकर्त्याचा फोन आला तरी कर्डिले संबंधित गावात हजर होत समस्येवर तोडगा काढत होते. परिणामी कर्डिलेंच्या कार्यकर्त्यांची वाढलेली ताकद त्यांना या विधानसभेच्या विजयासाठी मोलाची ठरली. दुसरीकडे तनपुरे यांच्या वेगवेगळ्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना कर्डिले मात्र आपल्या हिंदुत्वाच्या मुद्यावर तरुण, ज्येष्ठांसह महिलांना प्रचारात लक्षात ठेवून आगेकूच करीत होते. राहुरी विधानसभा मतदार संघ राहुरीसह अहिल्यानगर व पाथर्डी अशा तीन तालुक्यांमध्ये विभागलेला असताना प्रत्येक तालुक्यात नियोजनबद्ध प्रचार दौरे, मागिल निवडणुकीमध्ये झालेल्या चुकांवरून शिकवण घेत कर्डिलेंनी तनपुरेंचा उधळलेला विजयाचा वारू अखेर रोखल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. पहिल्या फेरीत 2 हजार 450 मतांची आघाडी घेत कर्डिलेंची विजयी घोडदौड सुरू झाली. राहुरी शहरासह काही गावांमध्ये तनपुरेंना लीड मिळाले, परंतू कर्डिलेंनी बरोबरीने मतदान घेत राहुरीतच तनपुरेंना जेरीस आणले. राहुरी परिसरामध्ये अत्यंत चुरशीची झालेली मतमोजणी अहिल्यानगर,पाथर्डी परिसरातील फेर्‍या सुरू होताच कर्डिलेंच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरली. राहुरी परिसरातून कर्डिलेंनीच बाजी मारुन 5 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेतले. यानंतर पाथर्डीसह अहिल्यानगर तालुक्यातील मतपेट्यांमधून कर्डिलेंचे मताधिक्य वाढत गेले. परिणामी कर्डिलेंनी या निवडणुकीमध्ये आपला वरचष्मा दाखवून देत महायुती शासनामध्ये मंत्रीपदाचा दावा ठोकल्याचे चित्र दिसत आहे.पहिल्याच फेरीपासून कर्डिलेंनी राहुरीत पकड निर्माण केली. सोनगाव- सात्रळ या प्रवरा पट्ट्यातून विजयी मताधिक्य घेत कर्डिलेंनी राहुरीत तनपुरेंना मताधिक्य मिळू दिले नाही. राहुरी शहरासह तालुक्यात तनपुरेंच्या हक्काच्या बालेकिल्ल्यात कर्डिलेंनी मताधिक्य प्राप्त केले.राहुरीतून तनपुरेंना मताधिक्य असेल, असे कर्डिले समर्थकही छाती ठोकून सांगत होते. परंतू कर्डिलेंनी ’होनी को अनहोनी’ ठरवित राहुरीच नव्हे तर अहिल्यानगरसह पाथर्डीतही मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळविले. राहुरी विधानसभा मतदार संघामध्ये कर्डिले यांनी महायुती शासनाच्या योजनांबाबत मायक्रो प्लॅनिंग करीत योजना राबविल्या.त्या राबविताना महिलांना बँकांमध्ये अडचणी निर्माण होऊ नये, शासकीयस्तरावर मदत मिळवून देण्याचे केले.परिणामी राहुरीत लाडक्या बहिणींनी शिवाजीराव कर्डिले हेच आमचे लाडका भाऊ असल्याचे मानत त्यांना मताधिक्य दिल्याची चर्चा झडत होती.

COMMENTS