Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तनपुरे पिता-पुत्रांचे कारखाना बंद पाडण्याचे पाप

मावळते चेअरमन नामदेव ढोकणे यांची टीका

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे या पिता-पुत्रांनी डॉ. तनपुरे कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र

बदलापूर घटनेचा बेलापूरात विविध संघटनानी केला निषेध
पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे…व्यायाम करणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यू
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे या पिता-पुत्रांनी डॉ. तनपुरे कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र रचून खाजगी कारखाना सुरू केला. त्यांनीच आता विखे पाटील मंडळावर भ्रष्टाचार आरोप सुरू केले आहे. त्यासाठी कोर्टामध्ये याचिका डॉ. सुजय विखे व संचालक मंडळावर दाखल केल्या आहेत. व आणखी दाखल करण्याचे षडयंत्र देखील असल्याचा आरोप डॉ. बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे मावळते चेअरमन नामदेवराव ढोकणे यांनी केला आहे.
               प्रादेशिक साखर संचालक अहमदनगर यांनी डॉ. तनपुरे प्राधिकृत कारखान्यावर अधिकान्यांची नियुक्ती केली असून सर्व संचालक मंडळाला नोटीस प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडून बजावण्यात आलेल्या  आहे.कारखान्याच्या सर्व संचालक मंडळांनी राहुरी येथे मुळा-प्रवरा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी नामदेवराव ढोकणे म्हणाले, वास्तविक बघता कारखान्याचे संचालक मंडळ हे शेतकर्‍यांचे पेमेंट करण्याचे नियोजन करीत होते. काल सायंकाळपर्यंत एफआरपीप्रमाणे शेतकन्यांचे सर्व पेमेंट त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे. कामगारांचे पगार देखील वेळेवर सुरू आहेत. कामगारांचे कोणत्याही प्रकारचे आंदोलन सुरू नव्हते. इतर देणी ही देण्याचे आमचे नियोजन चालू होते. तसेच शासनाने जी निवडणूक निधी उभारण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे 32 लाख रुपये भरण्याचे आमचे नियोजन सुरू होते. तथापि कारखाना बचाव समिती तथा कृती समिती यांनी औरंगाबाद येथे न्यायालयात कारखान्यावर प्रशासक नियुक्त करण्यात यावा, या प्रमुख मागणी करिता याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी 23 मार्च रोजी होणार होती. त्या अगोदरच शासनाने ही प्रशासक नेमण्याची कृती केलेली आहे.
          मागील संचालक मंडळ काळातील उत्पादक शेतकरी सभासद व ऊस उसाची 12 कोटी रुपये एफ. आर. पी. रकम शेतकर्‍यांना दिली. जिल्हा सहकारी बँकेचे थकीत कर्जापोटी 50 कोटी रुपये बँकेत भरले. त्यांच्या कार्यकाळातील काळातील 60 कोटी रुपये कामगारांना पगारापोटी दिले. महावितरण कंपनीचे थकीत बीज बिज 3 कोटी भरले. कामगाराच्या पी.एफ. फंडाची 9 कोटी भरले. कारखान्याच्या नुतनीकरणासाठी 12 कोटी रुपये खर्च केले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे थकीत देणी, कामगारांना पगारवाढ, श्री. स्वामी विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट या संस्थेच्या एकूण कर्मचार्‍यांचे पगार आम्ही दिले.सत्तेवर येण्यापूर्वीचे 18 पगार थकले होते ते पूर्ववत केले. नर्सिंग होम ट्रस्टवरील सर्व देणी 5.50 कोटी होती ती सर्व देऊन आम्ही नर्सिंग कॉलेजसाठी अद्ययावत एक कोटीची नवीन इमारत बांधली. असे असताना कारखाना बचाव कृती समिती या गोंडस नावाखाली स्थापन केलेल्या बचाव समितीने ज्यांनी कारखाना बंद पाडला त्यांच्या मदतीने कारखान्याला वेळोवेळी बदनाम करून कारखान्यावर प्रशासक यावे म्हणून याचिका दाखल केली व कारखान्यावर प्रशासक आणला. अशा पध्दतीने कारखाना कधीच सुरुळीत होऊ नये व त्यांचा खासगी कारखाना जोरात चालावा म्हणून हे षडयंत्र रचण्याचे काम विरोधकांनी केल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील,दत्तात्रय दुस,संचालक सुरसिंगराव पवार, शामराव निमसे, महेश पाटील, केशवराव पाटील, मच्छिंद्र तांबे, उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, गोरक्षनाथ तारडे, राजेंद्र उंडे, अमोल भनगडे, विराज धसाळ, ज्ञानेश्‍वर विखे, मनोज गव्हाणे आदी उपस्थित होते.

COMMENTS