Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील श्रीकृष्णनगर येथे टँकर मंजूर

बुलडाणा : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील श्रीकृष्ण नगर येथे पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्य

अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार
दौंड तालुक्यातील अपघातात दोन महिलांचा मृत्यू
तुळजाभवानी मंदिरात आता ड्रेसकोड

बुलडाणा : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील श्रीकृष्ण नगर येथे पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे श्रीकृष्ण नगर येथे एका टँकरव्दारे नियमित पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती चिखली उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

श्रीकृष्ण नगर येथे 567 पशुधन व 1 हजार 370 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 38 हजार 240 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

COMMENTS