Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 तानाजी सावंत महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे – शरद कोळी 

सोलापूर प्रतिनिधी - युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत  यांच्यावर तिखट भाषेत टिका केली आहे. काही दिवसांपूर्वी

“तुम्हाला १२ बैलांचा नांगुर लावल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही”
शहाजीबापू पाटलांच तोंड गटारीसारखं 
शरद कोळी यांनी भाषणात सुधारणा करावी 

सोलापूर प्रतिनिधी – युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत  यांच्यावर तिखट भाषेत टिका केली आहे. काही दिवसांपूर्वी तानाजी सावंतांनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त गर्दी सावंत बंधुनी पंढरपूरच्या मेळाव्यात जमवली असा दावा केला होता. त्यावर शरद कोळींनी जोरदार प्रहार केला आहे. तानाजी सावंत महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे. तानाजी सावंत यांच हे वक्तव्य भाजपा नेत्यांना मान्य आहे का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.  दरम्यान, भाजपवाल्यांना अटल बिहारी वाजपेयी बद्दल आदर असेल तर तात्काळ तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा असा आवाहन ही त्यांनी भाजपला दिलं आहे. दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांच डिपॉजिट जप्त होणार असल्याचा दावा ही कोळींनी केला आहे.

COMMENTS