Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकीय भूकंपाच्या चर्चांनी धरला जोर

केंद्रीय मंत्री शहांनी अर्धवट सोडला महाराष्ट्र दौरा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गुरूवारी पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चांनी जोर धरला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला महाराष्ट्र दौरा अर

पुण्यातच कोव्हिशिल्ड संपले; शहरातली सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवायची वेळ
पंतप्रधान जी-20 शिखर परिषदेसाठी रवाना
दोन हत्येमुळे अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे 

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गुरूवारी पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चांनी जोर धरला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला महाराष्ट्र दौरा अर्धवट सोडून राजधानी गाठणे पसंद केले तर, दुसरीकडे राज्यपाल बैस यांनी देखील आपला नाशिक आणि अहमदनगर दौरा रद्द केल्यामुळे राजकीय बदल होण्याचे संकेत दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करून चालणार नाही असे वक्तव्य करून राजकीय बदलाचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे 13 आमदार आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते. या नाराजीतून ते सुटीवर होते. शिंदे म्हणावे तसे काम करत नाहीत, अशी भाजप हायकमांडला वाटते. सत्तासंघर्षाचा निकाल विरोधात लागला, तर शिंदे यांची गच्छंती अटळ असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या निकालात आमदार अपात्रतेचा निर्णय आला, तर एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना राजीनामा तयार ठेवा, अशा सूचना दिल्याचे समजते. महाराष्ट्रातून प्रकल्प गेल्याची जोरदार चर्चा झाली. विरोधक अजूनही वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरतात. त्यात महाराष्ट्र भूषण सोहळ्यात चौदा भाविकांना जीव गमावावा लागला. या प्रकरणाचे खापरही शिंदे गटावर फोडण्यात आले. या प्रकरणी विचारलेल्या प्रश्‍नांनाही शिंदे गटाला तोंड द्यावे लागले. या सार्‍या प्रकरणावरून एकनाथ शिंदे एकाकी पडल्याचे समजले जात आहे.

भाकरी फिरवण्याची वेळ आली ः शरद पवार – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात मोठ्या फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार संपर्कात – मविआचे बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. उरलेले 13 आमदारही शिंदेंच्या संपर्कात आहेत अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे 20 लोकंही शिंदे यांच्या संपर्कात आहेत ही देखील चर्चा आहे. काँग्रेसचे बडे नेते काल महाबळेश्‍वरला शिंदे यांना भेटले अशीही चर्चा आहे, असा गौप्यस्फोट करतानाच चर्चा भरपूर होऊ शकतात. पण ते सत्यात उतरले पाहिजे, असे उदय सामंत म्हणाले आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली. संजय राऊत हे जगातील सगळ्यात शहाणे आणि विद्वान नेते आहेत. त्यांच्या समोर स्पर्धक म्हणून जगात एकही विद्वान शिल्लक राहिला नाही. देशातील सगळ्या विद्वानांचे राऊत हे महामेरू बनलेले आहेत. जगातील विद्वानांपेक्षा राऊत यांना जास्त अक्कल आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.

COMMENTS