Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलाठ्याच्या वाहनाल ट्रँक्टरची धडक

देवळाली प्रवरा ः राहुरी तालूक्यातील आरडगाव येथे वाळू चोरी करणार्‍यांवर वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी यांच्या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टर

नगर शहर भाजपने केला चक्क ; मनसे पदाधिकार्‍याचा सत्कार
Video : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो
राज्यात शनिवार, रविवारी लॉकडाऊन

देवळाली प्रवरा ः राहुरी तालूक्यातील आरडगाव येथे वाळू चोरी करणार्‍यांवर वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी यांच्या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन आरोपी ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
             राहुरी येथिल तहसिल विभागात बाबासाहेब रामजी पंडीत, वय 47 वर्षे, हे राहुरी येथे कामगार तलाठी म्हणून काम पाहतात. दि. 19 जून 2024 रोजी रात्री 11.30 वाजे दरम्यान तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशावरून बाबासाहेब पंडित व कोतवाल योगेश पुंजाहरी झुगे हे चारचाकी वाहनातून तालूक्यातील आरडगाव येथे चोरटी वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आरडगांव कडुन रोडने आल्याचे दिसले. तेव्हा तलाठी बाबासाहेब पंडित यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने ट्रॅक्टर थांबवला नाही. तेव्हा तलाठी बाबासाहेब पंडित यांनी चारचाकी वाहनातून त्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. तेव्हा ट्रॅक्टर चालकाने तलाठी बाबासाहेब पंडित यांच्या चारचाकी वाहनाला धडक देऊन तो ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. तलाठी बाबासाहेब रामजी पंडीत यांच्या फिर्यादीवरून आरोपी  विक्रम पार्वतीशंकर पेरणे, रा. आरडगांव, ता. राहुरी, याच्यावर गून्हा रजि. नं. 732/2024 भादंवि कलम 353, 379, 427 प्रमाणे वाळू चोरी व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गून्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

COMMENTS