Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळी ग्रामस्थांनी घेतला केवळ वृक्ष लागवड नव्हे; संवर्धनचाही वसा

कोपरगाव तालुका ः वृक्षलागवड केल्यानंतर त्यांचे जतन आणि संवर्धनदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. याकडे अनेकदा पाठ फिरवली जाते माञ याला टाकळी ग्रामस्थ अ

पाथर्डी शेवगाव महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धेला कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
अवघी दोन दिवसाची सवलत…मनपाने केले पुन्हा सर्व बंद ; किराणा-भाजी मिळण्यास येणार अडचणी, पोलिसांनी घेतला होता आक्षेप
कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी देवगड नगरी सज्ज

कोपरगाव तालुका ः वृक्षलागवड केल्यानंतर त्यांचे जतन आणि संवर्धनदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. याकडे अनेकदा पाठ फिरवली जाते माञ याला टाकळी ग्रामस्थ अपवाद ठरत असून ग्रामपंचायत बरोबरच वृक्षलागवडीचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पर्यावरणाला हातभार लागत असल्याचे टाकळीचे सरपंच संदिप देवकर यांनी सांगितले.
टाकळी ग्रामपंचायतच्या वतीने संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर  लोकाभिमुख विविध कार्यक्रमाचे आयोजन काले जाते त्याचाच एक भाग म्हणून ग्रामस्थांना वेगवेगळ्या  झाडांचे वितरण करण्यात आले त्याप्रसंगी सरपंच संदिप देवकर यांनी सांगितले की, मानवी जीवासह पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष महत्त्वाचे काम करतात. त्यांच्यामुळेच आपल्याला प्राणवायू मिळत असतो. त्यासाठी वड, पिंपळ, औदुंबर, आंबा, खैर, चिंच यासारख्या देशी झाडांची लागवड ही फायदेशीर आहे. त्यामुळे टाकळी ग्रामपंचायतच्या वतीने यापूर्वीच देशी जातीच्या एक हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. ही रोपे वाढावित म्हणून त्यांची नियमित काळजी घेण्यात येत असुन देशी झाडांमुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हा उपक्रम राबवताना उपसरपंच संजय देवकर ,ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब गुंड सर्व सदस्यांना बरोबर घेत अनेक नागरिक जोडले गेले आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट, अधिवास तसेच प्राणवायू हा उद्देश उराशी बाळगला आहे. त्यासाठी वृक्षलागवडीला बहर यावा याकरिता टाकळी ग्रामपंचायतच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचे सरपंच संदिप देवकर यांनी सांगितले.

COMMENTS