Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रावेतऐवजी शिवणेतील बंधार्‍यातून पाणी घ्या

खासदार श्रीरंग बारणे यांची महापालिकेला सूचना

पुणे/प्रतिनिधी ः पवना नदीवरील रावेत बंधार्‍यातील पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे महापालिकेने तेथून पाणी उचलणे बंद करावे. शिवणे येथील बंधार्‍यातून पाण

कोयत्याचा धाक दाखवून चौघांनी टेम्पो चालकास लुटले
इस्लामपूर येथील 400 कुटुंबियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी
अवघी दोन दिवसाची सवलत…मनपाने केले पुन्हा सर्व बंद ; किराणा-भाजी मिळण्यास येणार अडचणी, पोलिसांनी घेतला होता आक्षेप

पुणे/प्रतिनिधी ः पवना नदीवरील रावेत बंधार्‍यातील पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे महापालिकेने तेथून पाणी उचलणे बंद करावे. शिवणे येथील बंधार्‍यातून पाणी उचलण्यासाठी प्रयत्न करावेत. पाइपलाइन टाकण्यासाठी जागेचे भूसंपादन करावे, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित कामे आणि विविध विकास कामांबाबत खासदार बारणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त विठ्ठल जोशी, शहर अभियंता मकरंद निकम, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे आदी बैठकीला उपस्थित होते.

शहरातील पाण्याच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पवना नदीवरील रावेत बंधार्‍यातील पाणी अतिशय खराब आहे. तेथून उचललेले पाणी शुद्ध केले जाते. पण, या पाण्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देहूरोड कॅन्टोन्मेंट (छावणी) बोर्ड हद्दीतील अनेक नाले थेट नदीपात्रात मिसळतात. ड्रेनेज, स्टॉम वॉटर लाईनच्या नाल्यासाठी स्वतंत्र लाईन काढावी. मैलामिश्रित पाणी नदीपात्रात जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. रावेत बंधार्‍याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्याच्या कामाला गती द्यावी. रावेत बंधार्‍याऐवजी शिवणेतील बंधार्‍यातून पाणी उचलण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी पाईपलाईन टाकण्याकरिता जागेचे भूसंपादन करावे. चापेकर वाड्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. या कामाला गती द्यावी. त्यासाठी अधिकचा निधी लागल्यास राज्य शासनाकडून दिला जाईल. महापालिकेतील शिपाई संवर्गातील कर्मचार्‍यांना वाढीव वेतनश्रेणी मिळावी, घंटागाडी कामगारांचे प्रश्‍न सोडवावेत, निगडीतील महात्मा बसवेश्‍वर महाराजांच्या पुतळ्याची कामे तत्काळ मार्गी लावावीत, पवना नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा लवकर पूर्ण करावा, त्याच्या कामाला गती द्यावी, शहरातील कमी खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना जैव वैद्यकीय कचरा, परवानग्याबाबत अनेक अडचणी आहेत. त्यासाठी रुग्णालय संघटनेचे तीन प्रतिनिधी आणि महापालिका अधिकार्‍यांची संयुक्त समिती गठित केली जाणार आहे. ही समिती रुग्णालयाच्या अडचणी दूर करेल, असेही खासदार बारणे यांनी सांगितले. देहूरोड आयुध निर्माण कारखान्याचा (अम्युनिशन फॅक्टरी) संरक्षक भिंतीपासून दोनशे मीटर यार्ड हद्दीत किती कामे चालू आहेत, किती लोक बाधित होतील, याचा सर्व्हे करावा. बांधकाम परवानगी विषयक विकास करणे थांबविता येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने संरक्षण विभागाला लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होते की नाही हे तपासावे. या भागातील लोकांना त्रास देऊ नये, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

COMMENTS