अहमदनगर ः अहमदनगर शहर आणि उपनगरातील मारवाडी आणि गुजराती समाजातील व्यक्तींच्या जमिनी शोधून त्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा करणार्या दादावर कारवाई कर
अहमदनगर ः अहमदनगर शहर आणि उपनगरातील मारवाडी आणि गुजराती समाजातील व्यक्तींच्या जमिनी शोधून त्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा करणार्या दादावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीरभाई यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अहमदनगर शहरांमध्ये सावेडी उपनगर व केडगाव उपनगर या भागांमध्ये शहराच्या प्रमाणावर हद्दवाढ झालेली आहे. या विकासात बिल्डर व जमीन मालकांचे मोठे योगदान असतांना सावेडी उपनगरामध्ये मारवाडी व गुजराथी समाजाचे व्यक्तींचे जमीन पाहुन राजकीय आशीवार्दाने पोसलेले बेकायदेशीरपणे ताबा करून खंडणी मागण्याचा प्रकार करत आहेत. पोलिस प्रशासन ही या प्रकाराकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करीत आहे. पीडित व्यक्तींना पोलिसांकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने पोलिसांकडून सदरचा विषय हा दिवाणी स्वरुपाचा असल्याने आम्ही मदत करु शकत नाही असे उत्तर मिळत आहे. परिणामी पीडित व्यक्ती झालेल्या अन्यायाविरोधात उघडपणे दाद मागण्याचे धाडस करीत नाही. व नाईलाजास्तव जमीन कमी किंमतीत राजकीय मंडळींना विकावे लागते. नाहीतर संबधीत गुंडाना खंडणी देऊन त्याची कोणतीही वाच्यता न करता तडजोड करावी लागते. ही ताबे मारणारी टोळी कोणाला तरी कायदेशीर उभे करुन न्यायालयामध्ये खोटे दावे दाखल करुन सदर जमिनीचे लेटीकेशन तयार करुन ब्लॅकमेलींग करीत आहे.
असेच प्रकार केडगांव उपनगरात व अरणगांव रोड या ठिकाणी सुध्दा राजरोसपणे सुरु आहे. अरणगाव रोडवर काही पारधी समाजाचे व्यक्ती संघटीत टोळी तयार करुन मोकळया जमिनीवर ताबा मारलेला आहे. व संबधीत भुखंडधारकास सदरचा ताबा सोडण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात स्थानिक पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार करुन ही तक्रारकर्त्यास न्याय मिळत नाही. उलट या ताबे मारणार्या टोळीस पाठीशी घालण्यात येत आहे. त्यामुळे या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करणारे पोलिस अधिकारी विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेख यांनी राज्याचे गृहमंत्री, अपर मुख्य गृहसचिव, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे.
राजकीय गॉडफादरला देखील सहआरोपी करा – बेकायदेशीररित्या जमिनीवर ताबा मारण्याचा प्रकार गंभीर स्वरुपाचा असून त्यामुळे करोडो रुपयांची जमिनी खरेदी घेऊन बेकायदेशीर ताबा मारण्याचा प्रकारामुळे व्यापारी वर्ग भयभीत झालेला आहे. ते जमिनीत गुंतवणूक करण्यास धाडस करीत नाही. त्यामुळे वरील प्रकरणाची वरीष्ठ स्तरावरुन सखोल चौकशी होवून अशी बेकायदेशीर ताबे मारणार्यांच्या विरोधात महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभटटीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगारी, धोकादायक व्यक्ती प्रतिबंध अधिनियम व भारतीय दंड विधानसंहिता अन्वये गुन्हा दाखल होवून प्रतिबंध करण्यात यावे व त्यांचे राजकीय गॉड फादर यांनाही सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी शेख यांनी केली आहे.
COMMENTS