Homeताज्या बातम्यादेश

अजित पवार गटावर कारवाई करा

निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाची मागणी

नवी दिल्ली ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्ष नेमका कुणाचा यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. दोन्ही गटाकडून प

भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू ः खा. शरद पवार
आरक्षणप्रश्‍नी समन्वयाची भूमिकेची गरज ः खा. शरद पवार
19 हजार महिला बेपत्ता असतांना गप्प बसायचे का ?

नवी दिल्ली ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्ष नेमका कुणाचा यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असून सध्या निवडणुक आयोगासमोर यावर सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाच्या वकिलांनी युक्तीवाद करताना अजित पवार गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला असून खोटी शपथपत्रे सादर केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मोठी मागणी केली आहे.

या प्रकरणी शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीवेळी शरद पवार यांच्या गटाकडून युक्तिवादावेळी अजित पवार गटावर बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता. हाच मुद्दा पकडत शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी पुन्हा अजित पवार गटाविरोधात जोरदार युक्तीवाद केला. खोटी शपथपत्रे सादर केल्याप्रकरणी अजित पवार गटावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कुवर प्रताप सिंग हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. आणि ते शरद पवार गटासोबत आहेत. परंतु अजित पवार गटाने त्यांचे खोटे शपथपत्र आपल्या बाजूने सादर केल्याचेही शरद पवारांच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले. सिंघवी यांच्याकडून कायदेशीर कारवाई संदर्भातले काही दाखले देखील आयोगासमोर मांडण्यात आले. अजित पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगा ला संभ्रमात ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून शपथपत्रे सादर केलेली कुवर सिंग हे स्वतः या सुनावणीला शरद पवार यांच्यासोबत हजर होते. दरम्यान, आजच्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तसेच अजित पवार गटाकडून रुपालीताई चाकणकर, सुनील तटकरे, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारही उपस्थित होते.

COMMENTS