Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ताई-नानांचा अभिष्टचिंतन,मावंदे उद्यापन कार्यक्रम उत्साहात !

तागडगाव प्रतिनिधी - मजी सरपंच तथा आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र नावलौकिक असलेले नवनाथ राव पांडुरंगराव सानप आणि ताई म्हणून सर्वत्र ओळख असलेल्य

शिवसेना २ खासदार लढवणार ; ते जिंकुन आणु ही आमची भूमिका l LOKNews24
मतदार यादीतून हटवली 1.66 कोटी नावे
आई-वडिलांवर घातक शस्त्राने हल्ला करण्याचा डाव उधळला

तागडगाव प्रतिनिधी – मजी सरपंच तथा आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र नावलौकिक असलेले नवनाथ राव पांडुरंगराव सानप आणि ताई म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या त्यांच्या पत्नी सुरेखा नवनाथराव सानप यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच मावंदे उद्यापन कार्यक्रम शनिवार दिनांक 6 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला जिल्हाभरातून नातेवाईक, मित्रपरिवार, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तागडगाव पंचक्रोशी मध्ये सर्वत्र ओळखले जाणारे नवनाथ राव सानप यांची यावर्षी सत्तरी पूर्ण झाली, तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखा नवनाथराव सानप यांचे 61 व्या वर्षात पदार्थ जाळे आहे. त्याचप्रमाणे सानप दाम्पत्यांनी नुकतीच चारधाम यात्रा पूर्ण केले आहे.त्यानिमित्त प्रा. सचिन सानप सर यांनी या वैशिष्ठ्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, रामदास बडे, रामराव खेडकर, जालिंदर सानप, सुभाष क्षीरसागर, आजिनाथ गवळी, सर्जेराव तात्या तांदळे, दीपक नागरगोजे तागडगावचे माजी सरपंच प्रभाकर नाना सानप, बाबासाहेब आण्णा सानप, ओंकार सानप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनाथ सानप आणि सुरेखा ताई सानप यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि मावंदे उद्यापन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला तागडगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाकर विनायकराव सानप, राजेंद्र बाबुराव सानप, अशोकराव सानप, दिलीपराव सानप, काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष रमेशराव सानप, सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र सानप, माजी सरपंच भागवत सानप, माजी सरपंच बबनराव पोकळे, उद्योजक पोपट शेट कोठारी, उद्धवराव सोनवणे, त्रिंबक चांदणे, सोभाचंद शिंदे, शहादेव होनमाने, अंकुश चांदणे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

COMMENTS