Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ बंद होणार ?

मुंबई प्रतिनिधी - छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणून 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ला ओळखलं जातं. हा विनोदी शो आपल्या हलक्या-फुलक्

चक्क बोनस मध्ये जिवंत कोंबडी आणि दारूची बॉटल
मनोज जरांगेंच्या सभेच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या
प्रियांका चोप्राने शेअर केली मुलगी मालतीची पहिली झलक

मुंबई प्रतिनिधी – छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ला ओळखलं जातं. हा विनोदी शो आपल्या हलक्या-फुलक्या विनोदाच्या जोरावर गेली 14 वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध प्रेक्षकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक हा कार्यक्रम अत्यंत आवडीने पाहताना दिसून येतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. दयाबेन, जेठालालपासून ते पोपटलालपर्यंत सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शोमध्ये मोठा बदल झालेला दिसून येत आहे. मालिकेतील अनेक कलाकारांनी शोला रामराम ठोकला आहे. नुकतंच मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी हा शो सोडला आहे. दरम्यान आता ही मालिका बंद होणार का? अशी चर्चा सुरु आहे या सर्व बाबींवर अभिनेत्री आणि दिग्दर्शक मालव राजदा यांची पत्नी प्रिया अहुजाने स्पष्ट उत्तर देत आपलं मत मांडलं आहे. पाहूया प्रियाने नेमकं काय म्हटलंय. प्रिया पुढे म्हणाली, ‘शोच्या कॉलिटिमध्ये कोणताही बदल झालेला नाहीय. हा प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे अनेकांना तसं वाटत असेल. मला हे टीआरपीचं गणित कधीच समजलं नाही. मला वाटत शो अधिप्रमाणेच चालत राहील. शो लवकरच बंद होईल असं मला अजिबात नाही वाटत’. असं म्हणत प्रिया अहुजाने या मालिकेच्या प्रेक्षकांना दिलासा दिला आहे.

COMMENTS