Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरसाटवाडी दगडफेक प्रकरण घडवून आणलेला सहानुभूती स्टंट : प्रताप ढाकणे

पाथर्डी :आमदारांना आपला पराभव दिसत असल्याने शिरसाटवाडी येथे त्यांनी सहानुभूती स्टंट घडवून आणला असून आमची,कार्यकर्त्यांची,आणि तालुक्याची बदनामी हो

आमदार आशूतोष काळे यांनी पाच कोटी बाबत दिशाभूल करू नये- उपनगराध्यक्ष कुरेशी
नगरमध्ये समस्या…दूषित पाणी-खड्डे-बंद पथदिवे-मोकाट कुत्री व जनावरे
Sangamner : संगमनेर शहरामध्ये ६० टक्के लसीकरण पूर्ण (Video)

पाथर्डी :आमदारांना आपला पराभव दिसत असल्याने शिरसाटवाडी येथे त्यांनी सहानुभूती स्टंट घडवून आणला असून आमची,कार्यकर्त्यांची,आणि तालुक्याची बदनामी होऊ नये तसेच लोकांसमोर एकच बाजू येऊ नये यासाठी खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे प्रतिपादन शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रताप ढाकणे यांनी केले. ते शिरसाटवाडी मतदान प्रक्रियेदरम्यान दगडफेक घटनेची दुसरी बाजू त्याच्या शिक्षक कॉलनी येथील निवासस्थानी मांडत होते.
यावेळी प्रभावती ढाकणे,शिवशंकर राजळे,बंडू पाटील बोरुडे,संदीप राजळे,नासिर शेख,ऋषिकेश ढाकणे,सीताराम बोरुडे,देवा पवार,अक्रम अतार, योगेश रासने,प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह शिरसाटवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी घडलेल्या घटनेची माहिती सांगताना ढाकणे यांनी म्हटले की,शिरसाटवाडी येथे मतदान केंद्रावर आमदारांना कार्यकर्ते,मुले आणि पोलिस प्रशासन येथून जाण्याची विनंती करत असताना त्यांनी योग्य भूमिका घेणे गरजेचे असताना त्या तिथेच थांबून राहत त्यांनी ज्यांच्यावर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल अशा कार्यकर्त्यांना शिरसाटवाडी येथे बोलावून घेतले त्यांनी गावातील लोकांना शिव्या देत दगड फेकल्यानंतर गोंधळ उडाला. निवडणूका आल्या की नेहमीच शिरसाटवाडी गावाला बदनाम केले जात असून वाडीतील लोकांनी बेकायदा सावकारी लोकांचे संसार उध्वस्त केले काय, प्लॉट जमिनी हडप केल्या काय, गुंडगिरी करत व्यापाऱ्यांचे गल्ले लुटले काय, व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत लुटले का ते दाखवा जे ताबेमारी करतात ते तुमच्या सोबत आहेत.काल केलेली स्टंटबाजी असून निवडणूक आयोगाकडे जाण्यासाठी हे त्यांनी घडवून आणले आहे राजकारणा पेक्षा तालुका मोठा असून स्व.बाळासाहेब भारदे,मारुतीराव घुले पाटील,बबनराव ढाकणे,बाबुजी आव्हाड,रावसाहेब म्हस्के पाटील यांनी सामाजिक सलोखा आणि विकासाच्या मुद्यावरतीच काम करत सुसंस्कृत राजकारण केले असून त्याच पद्धतीने सर्व जाती धर्माना सोबत घेऊन जातीवादाचे वातावरण बंद करत राजकारण करायचे असे ढाकणे शेवटी म्हणाले. तर यावेळी बोलताना प्रभावती ढाकणे यांनी म्हटले की,तुमचा तुमच्या कामावर विश्वास असेल, कोट्यवधींचा निधी तुम्ही मिळवला असे म्हणत असाल तर तुम्हाला विशिष्ट दोन गटातच का फिरावे लागले.ज्या पंकजा ताईंच्या जीवावर तुम्ही मते घेतली, त्यांच्यावर सुद्धा तुमचा विश्वास नसल्याने तुम्ही त्यांचा प्रभाव असलेल्या दोन गटातच फिरत होता.कोणत्या समाजावर प्रतापरावांनी कधी दहशत केली नाही. प्रतापराव रडून मते मागत आहेत असे तुम्ही म्हणता. तुम्ही सुद्धा दहा वर्षे रडूनच मते मागितली.

COMMENTS