Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांचे लाक्षणिय काम बंद आंदोलन

नवी मुंबई प्रतिनिधी - माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी लाक्षणिक काम बंद आंदोलन पुकारले असून, रात्री पासूनच APMC मार

Sangamner : भाजप नेत्याच्या गाड्या रात्रीतून दिल्या पेटवून
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या शनिवारी
कोल्हापूरात तिसर्‍या लाटेत रुग्णसंख्या दीडपटीने वाढणार

नवी मुंबई प्रतिनिधी – माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी लाक्षणिक काम बंद आंदोलन पुकारले असून, रात्री पासूनच APMC मार्केट चे संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदला व्यापारांनी पाठिंबा दिला असून, यात व्यापारी ही सहभागी झाले.  असल्याचे चित्र मार्केट मध्ये दिसत आहे. राज्य सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून, अनेकवेळा पत्र व्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही, त्यामुळे आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले असल्याची माहिती माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कालच दिली. जर यातून काही मार्ग निघाला नाही आणि सरकार जागे झाले नाही, तर राज्यातल्या संपूर्ण APMC मार्केट अनीच्छित काळासाठी बंद केल्या जातील असा इशारा ही नरेंद्र पाटील यांनी दिला. मात्र आज पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण मार्केट मध्ये शुकशुकाट पाहायला मिळत असून, कामगार सकाळी 10 वाजता माथाडी भवन मध्ये एकत्र जमून पुढील रणनीती ठरवतील. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा काय असेल त्यावेळी समजेल. मात्र आता तरी मार्केट बंद पडलेले आहे. यावेळी नरेंद्र पाटील यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करताना, माथाडी बोर्डात काही खंडणीखोर घुसले असून, त्यांना पोलीस सपोर्ट करतात, राज्य सरकारला मोठ्या प्रकल्पात जास्त रस आहे , मात्र माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात नाही.  त्यामुळे माथाडी कामगार देशोधडीला लावण्याचे काम चालू आहे. आताच्या राज्य सरकार कडे आम्ही मागणी केली. मात्र ती पूर्ण होत नाही. त्यामुळे आज आम्ही बंद पुकारला असून, याला राज्य भरातील अनेक व्यापारी वर्गाचा पाठिंबा मिळत आहे.

COMMENTS