Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘स्वारगेट-मंत्रालय’ नवी हिरकणी सेवा सुरू

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळामधील नव्या हिरकणीची सेवा ‘स्वारगेट-मंत्रालय’ या प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या मार्गावरून सोमवारपासून सुरू झाली

मित्रांच्या मदतीने मुलीने बापाला संपवलं | LOKNews24
2018 मध्ये टीईटीच्या 600-700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क | DAINIK LOKMNTHAN
रेशीम संचालनालयाची भरती प्रक्रिया रद्द

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळामधील नव्या हिरकणीची सेवा ‘स्वारगेट-मंत्रालय’ या प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या मार्गावरून सोमवारपासून सुरू झाली आहे. पुणे विभागातील दोन नव्या हिरकणीची सेवा ‘स्वारगेट-मंत्रालय’ या मार्गावर चालवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी, अधिकार्‍यांना नव्या हिरकणी सेवेचा लाभ मिळाला आहे. एसटीच्या ताफ्यातील हिरकणी बस दुरावस्थेत होती. त्यामुळे अनेक प्रवाशांनी एसटी पाठ दाखवली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने स्व:बनावटीची हिरकणी तयार करण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या पुण्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत एकूण 200 नव्या हिरकणी तयार केल्या जात आहेत. सध्या रायगड, पुणे विभागाच्या ताफ्यात नवी हिरकणी दाखल झाली आहे. पुणे विभागातील दोन हिरकणी ‘स्वारगेट-मंत्रालय’ या मार्गावर चालवण्यास सोमवारपासून सुरुवात केली आहे. स्वारगेटवरून सकाळी 5.45 वाजता हिरकणी बस सुटेल आणि ही साधारण सकाळी 9/9.30 पर्यंत मंत्रालयात पोहचेल. त्यानंतर ही बस सकाळी 10 च्या दरम्यान मुंबई सेंट्रल आगारात दाखल होऊन तेथून स्वारगेटकडे रवाना होईल, असे नियोजन केल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

COMMENTS