Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर – करण गायकर  

नाशिक प्रतिनिधी -  येत्या ९ व १० सप्टेंबर ला स्वराज्य पक्ष प्रमुख हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्

कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ केंद्र व राज्य सरकारने उठवावी अन्यथा शेतकऱ्याच्या रोशाला सामोरे जाण्याची ताकद ठेवावी- करण गायकर 
शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो छावाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार- करण गायकर
छावा क्रांतिवीर सेनेमध्ये संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक तरुणांचा प्रवेश 

नाशिक प्रतिनिधी –  येत्या ९ व १० सप्टेंबर ला स्वराज्य पक्ष प्रमुख हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख करण गायकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली या दोन दिवसीय दौऱ्या दरम्यान संभाजीराजे अनेक सामाजिक घटकांशी संपर्क साधणार असून महाराष्ट्राची फसलेली राजकीय घडी सुधारण्यासाठी या दौऱ्याला अधिक महत्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. दि ९ सप्टेंबर रोजी संभाजीराजेंच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र स्वराज्य भवन या संपर्क कार्यालयाचे सायंकाळी ५ वाजता स्वराज्य भवन,मुंबई नाका, नाशिक या ठिकाणी उद्घाटन होणार असून त्या ठिकाणी उपस्थित जनतेला ते स्वराज्य चे आगामी व्हिजन व सुसंस्कृत महाराष्ट्राचे भविष्य या विषयावर संबोधित करणार आहे.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दि १० रोजी संभाजीराजे हे जिल्ह्यातील येवला लासलगाव मतदार संघाचा नियोजित दौरा करणार असून सुमारे या भागातील २५ गावांमध्ये स्वराज्य च्या शाखा अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे तसेच या दरम्यान ते अनेक शेतकरी कष्टकरी बांधवांच्या शेतातील बांधावर जाऊन प्रत्यक्ष असणाऱ्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणार आहेत,

स्वराज्य प्रमुख संभाजीराजे हे येवला पैठणी कला केंद्र येथे देखील सदिच्छा भेट देणार आहे कारण येवला शहरात तसेच ग्रामीण भागात पैठणीमुळे अनेक लोकांच्या हाताला काम मिळाले आहे या पैठणी उद्योगाच्या जोडीला आणखी कोणते उद्योगधंदे उभे करता येतील या गोष्टींचा ते आढावा घेणार आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील मैदानात भव्य जाहीर सभेचे आयोजन सायंकाळी सहा वाजता स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

यावेळी संभाजीराजे महाराष्ट्रातील आजची राजकीय परिस्थिती,शेतकरी कष्टकरी यांचे दुर्लक्षित असलेले प्रश्न यांसह सध्या महाराष्ट्रातील मुख्य पीक कांदा व त्यावर केंद्र सरकारने लावलेला चाळीस टक्के निर्यात कर यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी यातून मार्ग कसा काढता येईल त्याचबरोबर केंद्र सरकारने टॉमॅटोची आयात करून शेतकऱ्याला मिळणारा नफा बंद करून आत्महत्ये सारख्या गोष्टींना प्रवृत्त करणारा या सरकारच्या विरोधात स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवणार आहे. त्याचबरोबर स्वराज्य पक्षाची पंचसुत्री असलेल्या शेतकरी,कामगार,आरोग्य,सहकार,शिक्षण यावर आपले विचार ते मांडणार आहे.

या दौऱ्या मुळे नाशिक जिल्ह्यातील स्वराज्य पक्ष हा आणखी बळकट होणार असून आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा,महानगरपालिका जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्ष प्रस्थापित नेत्यांना चांगलीच टक्कर देणार असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

तरी या सर्व कार्यक्रम निमित्ताने जिल्ह्यातील जनतेने मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वराज्य पक्षाच्या  उत्तर महाराष्ट्र,राज्य कार्यकारिणी,जिल्हा, शहर व तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.

COMMENTS