Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वराज्य संघटना मैदानात

नाशिक प्रतिनिधी - स्वराज्य संघटना ,महाराष्ट्र. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने  निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांना PM किसान निधीच्या

सासरच्या जाचाला कंटाळून सेल्फी काढत उचललं टोकाचं पाऊल | LOKNews24
खासगी शिकवणीचालक आक्रमक
राष्ट्रवादीत कुणाचे पारडे ठरणार जड

नाशिक प्रतिनिधी – स्वराज्य संघटना ,महाराष्ट्र. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने  निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांना PM किसान निधीच्या वाटपामधील अडचणीचा पाढाच शिष्टमंडळाने मांडून प्रमुख छत्रपती संभाजी महाराज व संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

              कृषी क्षेत्राने उत्पादन आणि सेवा क्षेत्राची चमक गमावली असली तरी, ती अजूनही देशाच्या अन्न सुरक्षा व्यवस्थेचा कणा आहे. भारतातील ५० टक्के रोजगार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कृषी आणि संबंधित क्षेत्रांशी संबंधित असल्याने, सरकार विविध मार्गांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी देखील उत्सुक आहे. पीएम किसान किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना) ही अशीच एक योजना आहे जिथे शेतकऱ्यांना सहाय्यक आर्थिक मदत दिली जाते. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या क्षमतेला पाठिंबा देण्यासाठी पीएम किसान योजना लागू करण्यात आली आहे . शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केली आहे.त्यालाच जोड म्हणून नुकत्याच महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्प सादर केला त्यात राज्यसरकार देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेत मिळणारी लाभ रक्कम इतकीच रक्कम राज्यसरकार थेट बँक खात्या द्वारे मिळणार आहे अशी घोषणा केली खरी परंतु केंद्र सरकारच्या PM किसान निधी चा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नसुन काही हप्ते मिळाला परंतु काहीं हप्त्यां पासून तो मिळत नाही मग अशा परिस्थितीत शेतकरी अवकाळी पाऊस ,शेतमालाला भाव नाही,शेतीची लाईट कट होणे अशा नानाविविध समस्यांना त्रासलेले असताना अजून गोंधळात पडले आहे त्यांना नेमकं कारण समजत नसून बँकेत चौकशी केली तर बँक अधिकारी ,कर्मचारी उडवा उडवीची कारण देतात. नेमकं कारण समजत नाही. 

               केंद्र सरकारने नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता टाकला असला तरी लाभार्थी शेतकरी त्यांच्या बँक खात्याचे ई-केवायसी आधार कार्डशी लिंक करूनही  हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही.ई-केवायसी आणि आधार कार्ड लिंक करून देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. पीएम किसानचे प्राथमिक उद्दिष्ट प्रत्येक पीक चक्राच्या शेवटी लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे. तथापि, सर्व जमीनदार शेतकरी पीएम किसान योजनेचा भाग नाहीत. केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मदत मिळावी यासाठी भारत सरकारने विविध तपासण्या आणि निकष निश्चित केले आहेत.तरी देखील दप्तर दिरंगाई मुळे असे लाभार्थी शेतकरी पीएम किसान निधी पासून हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असेल तर सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना  मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आपण जबाबदार संबंधित यंत्रणेला आदेश देऊन वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली.

        आमच्या मागणीचा विचार गांभीर्याने करावा अन्यथा स्वराज्य संघटना तीव्र आंदोलन करेल याची कृपया नोंद घ्यावी असे जिल्हाप्रमुख उमेश शिंदे यांनी आवाहन क यावेळी निवेदन देण्यासाठी 

स्वराज्य संघटना नाशिक जिल्हाप्रमुख उमेश शिंदे ,सागर पवार विद्यार्थी आघाडी महानगरप्रमुख , संजय शिंदे ,संजय देशमुख, संदीप लभडे,सुदाम हळदे ,नितीन पाटील,सौरभ मराठे आदी उपस्थित होते.

COMMENTS