Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाधार योजना तालुका स्तरावर लागू करावी ः प्रा. बाबा खरात

संगमनेर प्रतिनिधी ः वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या ओबीसी प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर लागू करावी य

जय हिंद फाउंडेशनने पाथर्डी तालुक्यात लावली सर्वाधिक वडाची झाडे
गौराईच्या स्थापनेत साकारला चंद्रयान-3 चा देखावा
नगरजवळ होऊ शकते…नवे पुणे शहर…

संगमनेर प्रतिनिधी ः वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या ओबीसी प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर लागू करावी या मागणीचे निवेदन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना देण्यात आले असल्याची माहिती प्रा. बाबा खरात यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना बाबा खरात म्हणाले की, शासकीय मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या (मागासवर्गीय) विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर लागू असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर लागू करणेबाबत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा सदस्य आमदार बाळासाहेब थोरात, विधान परिषद सदस्य आ.सत्यजित तांबे ,पालकमंत्री राधाकृष्ण विखे तथा प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग, मुंबई यांना निवेदने, वारंवार पत्रे पाठवून देखील तालुकास्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू न झाल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. तालुकास्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू न झाल्यास मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाजाची मुले मुली महाविद्यालयीन उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. संगमनेर सारख्या प्रगत शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या तालुक्याच्या ठिकाणी फक्त 75 विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाचे वसतीगृह आहे. व मुलींसाठी 100 प्रवेश क्षमता आहे. मागासवर्गीय मुलींची वस्तीगृहासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्रवेश क्षमता केवळ 75 इतकी आहे.मागणी जवळपास 240 विद्यार्थ्यांसाठी आहे. यासाठी लवकरात लवकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हास्तरावरील स्वाधार योजना तालुकास्तरावर लागू करावी याबाबत तातडीने कार्यवाही होणेबाबत निवेदन दिले आहे. यावर तातडीने पाठपुरावा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लवकरच तालुका स्तरावर लागू करण्याचा प्रयत्न करू असे आश्‍वासन यावेळी खा. वाकचौरे यांनी दिले आहे,

COMMENTS