Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाभिमानी करणार 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन

गतवर्षीचे 400 रूपये दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ न देण्याचा पवित्रा

कोल्हापूर/प्रतिनिधी ः साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची होणार्‍या आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून,

एफआरपीपेक्षा 400 रुपये अधिकचे द्या : राजू शेट्टी
पांढऱ्या कपड्यातील साखर कारखानदार सर्वात मोठे दरोडेखोर ; शेट्टी
आदेश मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ असेल- राजू शेट्टी (Video)

कोल्हापूर/प्रतिनिधी ः साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची होणार्‍या आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, स्वाभिमानी संघटना 17 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषद 7 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरात होत असून, यापार्श्‍वभूमीवर राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना शेट्टी म्हणाले की, गतवर्षीचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा गर्भित इशारा देत स्वाभिमानी संघटनेने आगामी लढाईचे रणशिंग फुंकले आहे. दरासाठी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करू, अशी घोषणा शेट्टी यांनी यांनी केली. आगामी आंदोलनाची रणनीती कशी असेल? या संदर्भातील माहिती राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषद 7 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांवर पायी जाणार आहे. 22 दिवस हे आंदोलन सुरू असेल, असेही  शेट्टी यांनी जाहीर केले. शेट्टी यांनी सांगितले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. या दरम्यान साखर कारखान्यांवर पायी 522 किलोमीटर चालून आत्मक्लेश करण्यात येईल. दरम्यान, शेट्टी यांनी आजपासून साखर कारखान्यातून साखर बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी वाहतूक करणार्‍या बांधवांना सुद्धा वाहतूक करू नये असे आवाहन केले आहे. आंदोलन झाल्यास होणार्‍या नुकसानीसाठी ते स्वतः जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला. कर्नाटकातील साखर कारखान्याना देखील तोच नियम लावणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. 10 ऑक्टोबर रोजी कर्नाटकात देखील आमचं आंदोलन असणार असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचे आणि कर्नाटक रयत संघाचे आंदोलन असणार असल्याची त्यांनी सांगितले.

कारखान्याच्या दारात ढोल बजाओ आंदोलन – कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रत्येक कारखान्याच्या दारात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. गुरूदत्त, जवाहर, पंचगंगा व शरद साखर कारखान्यावर ढोल बजाओ आंदोलन करून 400 रूपये तातडीने देण्याची मागणी करण्यात आली. ऊस निर्यातबंदी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते. आता गेल्यावर्षीच्या तुटलेल्या ऊसाच्या हिशेबावरून स्वाभिमानीने साखर कारखान्यांना धारेवर धरले आहे.

COMMENTS