Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित्र बंद विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; घेराव नंतर वीज कनेक्शन सुरू

औंध : रोहित्र बंद केल्याच्या कारणावरून अधिकार्‍यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घेराव घातला. औंध / वार्ताहर : थकीत वीज बिलासाठी

तासगावसह नागेवाडी कारखान्याचे 12 कोटीचे धनादेश शेतकर्‍यांना देण्यात आले
फसवणूक करून हडपलेली जमीन सरकार जमा: प्रांताधिकारी कट्यारे यांचा ऐतिहासिक निकाल
पवनक्क्यांचे साहित्य चोरणारे नऊजणांना अटक

औंध / वार्ताहर : थकीत वीज बिलासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या महावितरणने थकीत शेती विज बिलाच्या वसुलीसाठी आता विज रोहीत्र बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मात्र, महावितरणच्या या निर्णाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमकपणे विरोध सुरू केला आहे. महावितरण कंपनीने शेतकर्‍यांकडील थकीत शेतीबिल वसुलीसाठी महावितरण कृषी योजना 2020 मध्ये आणली आहे. यामध्ये थकीत शेतीविज बिल भरल्यास विज बिलात 50 टक्क्यापर्यंत सूट देण्यात येणार आहे. मात्र, औंध विभागात गोपूज, शिरसवडीसह महावितरणच्या वसुलीमुळे शेतकरी संकटात आला. महावितरणने वसुलीच्या नावाखाली वीज रोहीत्र बंद करू नये, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या निर्णयाला विरोध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने औंध महावितरण कार्यालयावर मंगळवारी हल्लाबोल करत उपअभियंता लादे यांना घेराव घातला.
यावेळी स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे, बाबासाहेब घार्गे, नंदकुमार घार्गे, सुहेल कणसे, महादेव जाधव, योगेश शिंदे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.
पिके निघाल्यानंतर वसूल केल्यास शेतकर्‍यांना विज देयके भरण्यासाठी किमान पिकांचे तरी उत्पन्न मिळणार आहे. मात्र, विजेअभावी पिके जळून गेली तर पिकेही वाया जाणार असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वसुलीसाठी वीज रोहीत्र बंद करू नये, अशी मागणी यावेळी स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार आणि तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे यांनी केली. महावितरण कंपनीने रोहीत्र बंद करून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकर्‍यांचे चालू महिन्यातील वीजबिल भरून डीपी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे स्वाभिमानीच्या हल्लाबोलला यश मिळाले.

COMMENTS