Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुचिर बालाजीचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

न्यूयार्क : अमेरिकेत 26 वर्षीय सुचिर बालाजीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडापली आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच ओपनएआयवर प्रश्‍नचिन्ह उपस्थि

विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार : कृषिमंत्री दादाजी भुसे
साईबाबांच्या थीम पार्क आणि लेझर शो करीता 40 कोटीचा निधी मंजूर
कसोटी शिवसेनेसह शिंदे गटाची

न्यूयार्क : अमेरिकेत 26 वर्षीय सुचिर बालाजीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडापली आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच ओपनएआयवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. सॅन फ्रान्सिस्कोमधील बुकानन स्ट्रीटवरील फ्लॅटमध्ये सुचिरचा मृतदेह आढळला. सुचिर गेल्या 4 वर्षांपासून ओपनएआयशी संबंधित संशोधन करत होता. याशिवाय चॅट जीपीटीच्या विकासासाठीही त्यांने काम केले आहे. यापूर्वी त्यांनी ओपनएआयवर मोठे आरोप केले होते.
चॅटजीपीटी मेकर ओपनएआयचे व्हिसलब्लोअर सुचीर बालाजी अशी त्याची ओळख होती. सॅन फ्रान्सिस्कोमधील फ्लॅटमध्ये सूचिरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बालाजीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद माहिती आढळली नाही.

COMMENTS