Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांचे निलंबन

मालेगाव येथे कार्यरत असतांना अनुदान वाटपात अनियमिततेचा ठपका

देवळाली प्रवरा ः राहुरीचे विद्यमान तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी मालेगाव येथे कार्यरत असतांना जून ते ऑक्टोंबर, 2020 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झ

मनपाकडून कधी व्हायचे 213 कोटी वसुल…?थकबाकी दुर्लक्षित, पण नव्याने घरपट्टी वाढीवर मात्र प्रशासनाचा जोर
संदीप वराळ खून प्रकरण लवकर निकाली काढा
सुरक्षित दिवाळी साजरी करा… महावितरणचे आवाहन

देवळाली प्रवरा ः राहुरीचे विद्यमान तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी मालेगाव येथे कार्यरत असतांना जून ते ऑक्टोंबर, 2020 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात केलेल्या अनियमिततामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केले आहे. त्या संदर्भात विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यात दोषी आढळल्याने मालेगावचे तत्कालीन व राहुरीचे विद्यमान तहसिलदार चंद्रजित राजपुत यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा आदेश शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांच्या सही काढण्यात आला आहे.
राहुरी तहसिलदार चंद्रजित राजपुत हे मालेगाव जिल्हा नाशिक येथे तहसिलदार असताना जून ते ऑक्टोंबर, 2020 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा त्यांच्या ठपका ठेवण्यात आला होता. विभागीय चौकशीत राजपूत दोषी आढळल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे चंद्रजित राजपुत यांच्याविरुध्द शासन ज्ञापन  20 नोव्हेंबर 2023 अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 च्या नियम 8 व 12 अन्वये  महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 च्या नियम 4 (1) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन राहुरीचे तहसिलदार चंद्रजित राजपुत यांना तात्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असे हि आदेश देण्यात आले आहे. 

COMMENTS