Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 7 जणांचे निलंबन

पुणे/प्रतिनिधी : दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव पेठेतील कोयता हल्ला प्रकरणानंतर पुणे पोलिस चांगलेच अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. पुण्यात आ

पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती | LOKNews24
LOK News 24 I मोहिते-पाटील यांची निवडणूक आयोगाकडे नव्या पक्षाची नोंदणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली |

पुणे/प्रतिनिधी : दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव पेठेतील कोयता हल्ला प्रकरणानंतर पुणे पोलिस चांगलेच अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. पुण्यात आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात जणांचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्या निलंबनानंतर आता वारजे पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे.
कामामध्ये हलगर्जीपणा करणार्‍या तसेच कर्तव्य न पार पाडणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना पुणे पोलिस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडु सायप्पा हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलिस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलिस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर, पोनिस नाईक अमोल विश्‍वास भिसे आणि पोलिस नाईक सचिन संभाजी कुदळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. योग्यरित्या मोक्का कारवाई केली नाही, परिसरातील दारुची दुकानं बंद केली नाहीत, अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, आरोपींविरोधात कारवाई करण्यात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे या सगळ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचार्‍यांना निलंबन करण्यात आले होते. यापूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरुगेट पोनिस चौकीच्या पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी पुण्यातील सहकारनगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी बाकी सगळ्या पोलिसांची चौकशी केली त्यानंतर आणखी सात जणांवर कारवाई केली आहे. यापूर्वी सावळाराम साळगावकर, मनोज एकनाथ शेंडगे, समीर विठ्ठल शेंडे, हसन मकबुल मुलाणी, मारुती गोविंद वाघमारे, संदीप जयराम पोटकुले आणि विनायक दत्तात्रय जांभळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.  पुण्यात वाढती गुन्हेगारी पाहता अनेक पुणेकरांनी पुणे पोलिस नक्की काय करत आहेत?, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. सदाशिव पेठेत झालेल्या हल्ल्यानंतर पेरुगेट पोलिस चौकीत एकही पोलिस कर्मचारी उपलब्ध नव्हते त्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच संतापले होते. त्यानंतर आता पुण्यातील पोलिसांवर देखील कारवाई होणार आहे. दहा अधिकारी आणि कर्मचार्‍यांचं निलंबन केल्यानंतर पुण्यातील इतर पोलिसांवरही आयुक्तांची करडी नजर असणार आहे. त्यांना आयुक्तांनी कठोर सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात कसूर आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

COMMENTS