Homeताज्या बातम्यामनोरंजन

सुष्मिता सेनला ह्रदय विकाराचा झटका

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. सुष्मिता आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमीच तिच्या चाहत्या

नकली बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न;घटना CCTVमध्ये कैदI LOKNews24
निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका : खा. शरद पवार
माणदेशातील तलावांत केवळ 10 टक्के पाणीसाठा उपलब्ध

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. सुष्मिता आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला आहे. यानंतर तिला अँजिओप्लास्टी करावी लागली असून आता तब्येत बरी असल्याचं तिने सांगितलं आहे. मिस युनिव्हर्स असलेल्या सुष्मिताने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना या बातमीची माहिती दिली आहे.इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सुष्मिता काय म्हणाली… 47 वर्षीय सुष्मिता सेन हिने इन्स्टाग्रामवर आपल्या तब्येतिविषयी माहिती दिली. ही पोस्ट लिहिताना तिने आपल्या वडिलांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये सुष्मिताने म्हटलं आहे,’ मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंटही टाकण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डॉक्टरांनी ‘माझं हृदय फार मोठं आहे’ असं सांगितलं. तसेच, ज्या लोकांनी मला वेळेवर मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानते. या सगळ्यात चांगली बातमी अशी आहे की, मी आता पूर्णपणे बरी आहे आणि मी माझं आयुष्य पुन्हा जगण्यास तयार आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे

COMMENTS