Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळी बाजारसमितीचे राज्यात नावलौकिक करणार-सूर्यभान नाना

नवीन भाजीपाला विक्री जागेचे थाटात उदघाटन,विक्रेत्यांमध्ये आनंद

परळी प्रतिनिधी - मुख्य बाजारपेठेत भाजीपाला व फळ विक्रेत्यांमुळे मोठी कोंडी होत असल्यामुळे भाजीपाला व फळ विक्रेत्यांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून

मोठ्या बॅंकेत पत नसलेल्यांसाठी पतसंस्था – ना . डॉ . राजेंद्र शिंगणे
उत्तराखंडमध्ये भूस्खलन, बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद
देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी

परळी प्रतिनिधी – मुख्य बाजारपेठेत भाजीपाला व फळ विक्रेत्यांमुळे मोठी कोंडी होत असल्यामुळे भाजीपाला व फळ विक्रेत्यांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची अनेक वर्षांची मागणी आज सोमवारी पूर्णत्वास आली असून सभापती सूर्यभान (नाना) मुंडे व सर्व संचालकांच्या शुभहस्ते भाजीपाला विक्री नवीन बाजार जागेचे उदघाटन थाटामाटात संपन्न झाले असून परळी बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी व शेतकरीभिमुख निर्णय घेऊन परळी बाजार समितीचे राज्यात नावलौकिक करणार असल्याचा आत्मविश्वास सभापती सूर्यभान (नाना)मुंडे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान भाजीविक्रेत्यांना मुबलक आणि स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व व्यापार्‍यांकडून बाजार समितीचे आभार व्यक्त केले आहेत.
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाथ रोडवरील जागेत भाजीपाला विक्री नवीन जागेच्या उदघाटन फीत कापून व श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे,बाजारसमितीचे सभापती सूर्यभान (नाना) मुंडे,उपसभापती संजय जाधव, संचालक माऊली तात्या गडदे, दत्ताभाऊ देशमुख,  राजाभाऊ पौळ, भगवानराव फड, राजाभाऊ गिराम, सुरेश शेठ मुंडे, जयपाल सेठ लाहोटी, अशोकराव डिगोळे, प्रभाकरराव दहिफळे, राजाभाऊ जगताप, सुग्रीव गीते, वैजनाथराव सोळंके, विजय लड्डा, राधाकिशन साबळे, प्रभू आंधळे, सचिव बी आर रामदासी, हिशोबनीस गोविंद मुंडे, कर्मचारी  बळवंत, घोबाळे, चाटे, सय्यद, तिडके ,रमेश मुंडे, बाळू कांदे ,गायकवाड ,सोनवणे आदी मान्यवरांनी श्रीफळ फोडून नवीन भाजीपाला विक्री जागेचे उदघाटन करण्यात आले यावेळी सर्वच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सभापती सूर्यभान (नाना) यांनी पुढे बोलताना म्हणाले कि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आणि वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी बाजारसमिती शेतकरी व व्यापार्‍यांसाठी विविध योजना व विकासाभिमुख कार्य करत असून आगामी काळात परळी बाजार समितीचे राज्यात नावलौकिक करणार असून शेतकरी व व्यापारी यांच्या हिताचे निर्णय मोठ्या प्रमाणात घेणार असून यासाठी सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे अशे हि आव्हान सूर्यभान नाना मुंडे यांनी यावेळी केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन महेश मुंडे प्रस्ताविक बि आर रामदासी प्रमुख मार्गदर्शन माऊली तात्या गडदे ,वैजनाथराव सोळंके, सूर्यभान नाना मुंडे, उद्घाटन पर भाषण बाळासाहेब देशमुख, आभार प्रदर्शन जयपालशेठ लाहोटी यांनी केले आहे.

COMMENTS