Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सूरत कोर्टाचे वकील निकालापूर्वी बदलले ः अरविंद सावंतांचा दावा

मुंबई ः काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरील कारवाईबाबत, किंवा त्यांच्या कोर्टातील खटल्याबाबत जेवढी तत्परता दाखवली, तेवढी तत्परता महाराष्ट्रात

कोपरगावमध्ये ब्रम्हगौरव गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात
अंबाजोगाईतील अवैध धंद्याबाबत जबाबदार पोलीस निरीक्षकाला निलंबित करणार : उपमुख्यमंत्री फडणवीस
राज्यातून 5 ऑक्टोबरनंतर मान्सूनचा परतीचा प्रवास

मुंबई ः काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरील कारवाईबाबत, किंवा त्यांच्या कोर्टातील खटल्याबाबत जेवढी तत्परता दाखवली, तेवढी तत्परता महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेच्या खटल्याबाबत का दाखवत नाहीत, असा सवाल ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. अरविंद सावंत यापुढे बोलताना म्हणाले की, देशभरात घडणार्‍या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे.
 विरोधकांनी आता एकजुटीने लढा देण्याची वेळ आहे. हा लढा देण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत आहोत, असे वक्तव्य खासदार अरविंद सावंत यांनी केले आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई प्रकरणी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की दोन दिवस आधीच सूरत कोर्टातील न्यायाधीश बदलण्यात आले. अरविंद सावंत म्हणाले की, चोरों का नाम मोदी ही क्यों होता है… या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्या कोर्टात गुरुवारी राहुल गांधी यांच्यावरील खटल्यासंबंधी सुनावणी होणार होती. मात्र 2 दिवस आधीच सूरत कोर्टातील न्यायाधीश बदलण्यात आले, असा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे. देशातील लोकशाही व्यवस्थेवरचा विश्‍वास उडालाय, असा आरोप शिवसेना नेते करतांना दिसून येत आहे. मात्र, न्यायव्यवस्थेचा वापरही अशा प्रकारे करता येऊ शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला का असा सवाल त्यांनी केला. अरविंद सावंत म्हणाले की, राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. याविरोधात त्यांना उच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते. मात्र त्यापूर्वीच लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय उतावीळ होऊन ही कारवाई झाल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. 

COMMENTS