Homeताज्या बातम्यासंपादकीय

अभिजात वर्गाच्या अहंकाराला सुरज’चा गुलिगत धोका!

 जगाच्या रंगमंचावरील प्रत्येक व्यक्ती अभिनेता आहे, असं म्हणणाऱ्या शेक्सपियर ने प्रत्येक माणसात जन्मजात अभिव्यक्त होण्याची एक कला असते, हे सांगण्य

व्यायामशाळा आणि ब्युटी पार्लरसाठी निर्बंध शिथील
अन्यथा सहकार मंत्र्याची शिमगा दिवाळी साजरी करू : आ. सदाभाऊ खोत
अभिनेता दीपक तिजोरीची 17 लाखांची फसवणूक

 जगाच्या रंगमंचावरील प्रत्येक व्यक्ती अभिनेता आहे, असं म्हणणाऱ्या शेक्सपियर ने प्रत्येक माणसात जन्मजात अभिव्यक्त होण्याची एक कला असते, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे जीवनातील सर्वच गोष्टी बुद्धिबळा इतक्याच बुद्धीने कराव्या लागतात, या दोन्ही गोष्टींचा जर सार आपण पाहिला, तर, काल मराठी बिग बॉसच्या पाचव्या सत्राचा विजेता सुरज चव्हाण याच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल. एकेकाळी टिक टॉक या चिनी ॲपवरून भारतीय तरुण-तरुणींना आपल्यातील अभिनय अभिव्यक्त करण्याची एक संधी मिळाली. त्यामुळे टिक टॉक वरील स्टार्स हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले. परंतु, राज्यकर्त्यांनी आपल्या चीन धार्जिण्या धोरणाला लपविण्यासाठी, चीनने आधुनिक जगात निर्माण केलेल्या समाज माध्यमावरच बंदी आणून, या तरुणांचा हिरमोड केला होता. पण, या संधीचा फायदा पाश्चिमात्य देशाच्या समाज माध्यमांनी उठवला नसता तरच नवल! त्याची परिणती नव्या समाज माध्यमांनी टिक टॉक सारखे रील बनवण्याची टेक्नॉलॉजी भारतात आणली. पुन्हा तरुण-तरुणींच्या उत्साहाला उधाण आलं. त्यातूनच पुढे आलेला एक तरुण म्हणजे, सूरज चव्हाण! ज्याची नुकत्याच संपलेल्या बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता म्हणून घोषणा करण्यात आली. सुरज हा अगदी ग्रामीण जीवन जगणारा आणि ग्रामीण भागामध्ये साधा यापेक्षाही भोळा म्हणून ओळखला जाणारा. भाषा किंवा शब्द प्रभुत्व नसताना, आज महाराष्ट्र त्याच्या शब्दांच्या कोट्या करतो आहे.  त्याच्या शब्दातून अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करतो आहे. ज्या सुरज चव्हाणकडे कोणतेही भाषा प्रभुत्व नसताना, त्याच्या शब्दांनी महाराष्ट्रावर गारुड टाकले आहे. ज्यामध्ये ‘गुलीगत धोका’, बुक्कित टेंगूळ आणि झापुक-झुपूक या शब्द वैशिष्ट्यांनी महाराष्ट्र एकमेकांचं मनोरंजन ही करतो आहे आणि एकमेकांना संदेश ही देतो आहे. या स्पर्धेदरम्यान सुरज चव्हाण याला झापुक-झुपूक या शब्दाचा अर्थ निवेदक डॉ. निलेश साबळे यांनी विचारला होता; त्यावेळी, त्याने दिलेलं उत्तर मजेशीर तेवढेच विचार करायला लावणार होते. तो म्हटला होता की, “मलाही या शब्दाचा अर्थ माहित नाही. परंतु, एखाद्या गोष्टीच्या संदर्भात मनापासून व्यक्त होण्यासाठी जो शब्द मी वापरतो, तो म्हणजे झापुक-झुपूक हा शब्द येतो, असे सांगितले. गुलीगत धोका हा तर त्याने एखाद्या अज्ञात प्रियसीला उद्देशून वापरलेला शब्द आहे. ज्या वेगाने तिने धोका दिला असतो, तसाच धोका जीवनात कोणीही दिला तर तो एका बंदुकीच्या गोळी सारखा असतो, असं समीकरण त्याने आपल्याच शब्दात बनवून, त्याने महाराष्ट्राला एक नवा वाक्प्रचार ही दिला आहे. बिग बॉस सारख्या स्पर्धेत सुरत चव्हाणच यशस्वी होणं, हा नशिबाचा भाग नाही; तर, त्यात त्याचे बुद्धीचातुर्य आहे. जगातील कोणतीही व्यक्ती ती शिक्षित असो वा अशिक्षित, ती निरक्षर असली तरी ती अज्ञानी आहे, असं म्हणता येत नाही. ज्ञान हे माणसाच्या सभोवताली असणाऱ्या एकूणच वातावरणातून त्याला मिळत असतं आणि म्हणून प्रत्येक माणसा जवळ  ज्ञानसाठा आहे. मात्र, अभिजात वर्गाने अशा प्रकारचा ज्ञानसाठा हा फक्त उच्चशिक्षित आणि श्रीमंत वर्गाकडेच आहे, असा एक गैरसमज करून घेतला आहे. अभिजात वर्गाच्या या गैरसमजाला सुरत चव्हाण यांने गुलिगत धोका दिला आहे! अर्थातच, त्याने अभिजात वर्गाच्या या समीकरणाला उध्वस्त करून टाकले आहे. कोणतेही शिक्षण नसताना, भाषा प्रभुत्व नसताना आणि ज्या सेलिब्रिटी त्याच्यासोबत बिग बॉस मध्ये निवडल्या गेल्या होत्या, त्या, सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वासमोर तो झाकोळला गेला होता. परंतु, कोणाचाही दबाव त्याने आपल्या मनावर येऊ दिला नाही. ही बाब त्याच्या बिग बॉस मधील सर्वोच्च खेळीचे प्रमाण देणारी गोष्ट आहे! आपल्यापेक्षा वरचढ नव्हे; तर, ज्यांना आपण कधी पाहू शकत नाही, ज्यांच्या सोबत वावरण्याची संधी येण्याचे केवळ स्वप्न देखील बघू शकत नाही, अशा व्यक्तीला एवढ्या दिग्गजांसमोर राहण्याची वेळ येऊनही तो त्यांच्या व्यक्तिमत्वाने दबला जात नाही; ही बाब खरे तर वाखाणण्याजोगी आहे. सुरज चव्हाण यामध्ये महाराष्ट्रात च्या प्रेक्षकांसमोर एक प्रमाण ठरला आहे! बिग बॉस किंवा तत्सम खेळ जे सार्वजनिक दृष्ट्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित केले जातात, त्यामध्ये अर्थकारणाचे राजकारण जरी असलं, तरी, व्यक्तीला निवडण्यासाठी त्याच्याविषयी सहानुभूती समाजात निर्माण करणे असे शैली निश्चितपणे असते परंतु सुरत चव्हाण याला केवळ सहानुभूतीतून मतदारांनी मत दिले नाही; तर, तो प्रचंड मोठ्या सेलिब्रिटी समोर दबला न जाणं, हा जो आत्मविश्वास त्याने दाखवून दिला, त्यावर महाराष्ट्राने प्रेम केलं!  महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांनी त्याला भरभरून मतदान केलं. त्याचाच परिणाम तो या खेळामध्ये यशस्वी होऊन विजेता ठरला. याचं सर्वस्वी श्रेय त्याच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेलाच आहे. अन्य कोणत्याही गोष्टीला नाही, हे मात्र निश्चितपणे खरे आहे!

COMMENTS