Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सूरज नामदे यांना बेदम मारहाण

अवैध धंद्याची तक्रार केली म्हणून हल्ला

अहमदनगर ः सीना नदी रुंदीकरण, स्वच्छता अशा अनेक महत्तवपूर्ण मुद्द्यांवर गेल्या दशकभरापासून लढा देत असलेले सामाजिक कार्यकर्ते सूरज नामदे यांच्यावर

जामखेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
नगर-आष्टी रेल्वे मार्गावर हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी
कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार व्हावा ः आ. आशुतोष काळे

अहमदनगर ः सीना नदी रुंदीकरण, स्वच्छता अशा अनेक महत्तवपूर्ण मुद्द्यांवर गेल्या दशकभरापासून लढा देत असलेले सामाजिक कार्यकर्ते सूरज नामदे यांच्यावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. अवैध धंद्याची तक्रार केल्याच्या आरोपातून हल्ला करण्यात आल्याचा आरोप नामदे यांनी केला आहे.
नामदे शहरातील विविध सामाजिक प्रश्‍नांवर ते कायदेशीरपणे प्रशासकीय यंत्रणांना जाब विचारत असतात. अहमदनगर शहरात सामाजिक प्रश्‍न अनेक आहेत. त्यावर लोक कल्याणासाठी प्रशासनाला सातत्यपूर्ण जाब विचारून संवैधानिकरीत्या प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी नामदे सातत्याने अगे्रसर असतात. गौरी घुमट येथील रहिवासी परिसरात, जवळच तुळजा भवानी मंदीर, पार्वतीबाई डहाणूकर शाळा, जिल्हा परिषद अंगणवाडी, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान इत्यादी सामजिक व शैक्षणिक संस्था असताना एका व्यक्तीने बिर्याणी हाऊस आणि हॉटेलच्या नावाखाली अवैध दारुचा गुत्ता, व सट्टा, मटका, जुगार,धुम्रपान असे सर्व अवैध बेकायदेशीर धंदे चालु केले आहेत. या अवैध धंद्याचीच सुरज नामदे व परिसरातील सर्व नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. म्हणुन 7-8 वेळा तेथे छापे पडले होते. त्याचा राग मनात धरूनच 18 ते 19 रोजी या अवैध व्यवसाय करणार्‍यांनी व त्याच्या परिवारातील सदस्य व मित्रांनी सूरज नामदे यांच्यावर जीव घेणा हल्ला केला. त्या हल्ल्यातुन ते बालबाल बचावले. मात्र त्यांच्यावर झालेला हा हल्ला म्हणजे अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात अराजकता पसरली असल्याचा एक पुरावाच आहे. सदर प्रशासकीय यंत्रणा गुंडशाहीने ताब्यात घेतली आहे असा आरोप नामदे यांनी केला आहे.

COMMENTS