सुप्रिया सुळेंनी देखील त्यांचा ’वायनाड’ मतदारसंघ शोधावा : माजी मंत्री राम शिंदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रिया सुळेंनी देखील त्यांचा ’वायनाड’ मतदारसंघ शोधावा : माजी मंत्री राम शिंदे

इंदापूर/प्रतिनिधी : भाजपने गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबियांचा हक्काचा मतदारसंघ असलेला अमेठीतून राहुल गांधींना पराभूत करून, या जागेव

कृष्णा-भीमा स्थिरीकरणात जामखेड तालुक्याचा समावेश करा
कर्जत-जामखेडसाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजूर
निकालाने ते खालच्या पायरीवर आले ः आ.प्रा. राम शिंदे

इंदापूर/प्रतिनिधी : भाजपने गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबियांचा हक्काचा मतदारसंघ असलेला अमेठीतून राहुल गांधींना पराभूत करून, या जागेवर भाजपच्या स्मृती इराणी विजयी झाल्या होत्या. त्यानंतर आगामी 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, भाजप बारामतीचा गड सर करणारच असा विश्‍वास बारामतीच्या प्रभारीपदाची जबाबदारी असणारे भाजप नेेते माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर इंदापूर येथील अर्बन बँकेच्या आयोजित भाजप संवाद बैठकीत प्रा. शिंदे बोलत होते.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, अमेठीचा किल्ला आम्ही जसा सर केला तसा यंदा बारामतीचा किल्ला सर करणार. 2014 साली आम्ही अमेठीत हरलो होतो पण आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीने आम्ही 2019 ला यश मिळवले. राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ शोधला होता. पण आता सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा ’वायनाड’ शोधावा. कारण आता बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे, यंदा काहीही झालं तरी बारामतीचा गड सर करणारच असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे म्हणाले की, अमेठीमध्ये 2014 साली आम्हाला पराभवाचा धक्का बसला. पण त्यानानंतरही आम्ही थांबलो नाही. आमचे प्रयत्न आम्ही सुरुच ठेवले. पण आम्हाला 2019 ला यश मिळालेच. राहुल गांधी पराभूत होतील, असे कोणालाही वाटत नव्हते पण भाजपने त्यांना पराभूत करुन दाखवले. ए फॉर अमेठी मिशन सक्सेसफूल झाले, आता बी फॉर बारामतीचे मिशन आम्हाला साध्य करायचे आहे. एकंदरितच भाजपने बारामतीमध्ये वातावरण निर्मिती जोरात सुरू केली असून, कार्यकर्त्यांचा राबता वाढला आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगतांना दिसून शकतो. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पृथ्वीराज जाचक, अविनाश मोटे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मारुती वणवे, तेजस देवकाते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

बारामतीला देणार केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन भेट
बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीला अजून दोन-अडीच वर्षांचा कालावधी राहिला असतांनाच तापतांना दिसून येत आहे. यावेळेस बारामती जिंकायचाच असा पण भाजप कार्यकर्त्यांनी केल्यानंतर त्यांच्या या निश्‍चयाला दिल्लीतून बळ मिळणार असल्याचे चिन्हे आहेत. त्याचपार्श्‍वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सप्टेंबर महिन्यातील 22,23 व 24 तारखेला बारामतीला भेट देणार आहेत. तर दुसरीकडे नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 6 तारखेला बारामतीच्या दौर्‍यावर असणार आहेत. सीतारामन यांच्या दौर्‍याच्या तयारीचा आढावाही बावनकुळे घेणार आहेत.

COMMENTS