Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने शिंदे फडणवीस सरकार कायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे – चंद्रशेखर बावनकुळे 

धाराशिव प्रतिनिधी- राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असून त्यातुन उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नवीन सर

घरात बसून पक्ष चालवणारे कोणालाच संपवू शकत नाही – बावनकुळेंचा दावा
राज्यात भाजपच्या 152 जागा निवडून येणार
शिंदे-फडणवीस दररोज १८-१८ तास काम करतात 

धाराशिव प्रतिनिधी- राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असून त्यातुन उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नवीन सरकार कायदेशीर असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. शिंदे गटाला दिलासा देत १६ आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे हे सरकार मजबुत व स्थिर असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राज्यपालावरील सुप्रीम कोर्टाची टिप्पणी व संजय राऊत यांनी नैतिकता ठेऊन शिंदेंनी राजीनामा द्यावा म्हटलंय यावर बोलताना राज्यपालाचे अधिकार व सुप्रीम कोर्ट हा त्यांचा विषय असून राजीनामा देण्याचे कारण काय हे सरकार कायदेशीर असल्याचे बावनकुळेंनी म्हटले आहे.

COMMENTS