नवी दिल्ली ः तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन धर्म संपवा’ या विधानावरून सर्वोच्च न्यायालयान

नवी दिल्ली ः तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन धर्म संपवा’ या विधानावरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांना फटकारले. तुम्ही सामान्य माणूस नाही, मंत्री आहात, विधानाच्या परिणामांचा विचार करायला हवा होता असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात अनेक राज्यांत एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. उदयनिधी यांनी सर्व एफआयआर एकाच ठिकाणी एकत्र करण्यात यावेत, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती. उदयनिधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी न्यायालयात हजर झाले.
COMMENTS