Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अयोध्या दर्शनासाठी पाठबळ देणाऱ्या आ. राहुल ढिकले यांचा सत्कार

नाशिकमधील आस्थाट्रेन मधून अयोध्येत घेतले हजारो भक्तांनी नुकतेच दर्शन

नाशिक प्रतिनिधी -  शहर , परिसरातील जेष्ठ नागरिक, महिलांचा रामलल्लाच्या दर्शनाचा  योग ज्यांनी  घडवून आणला त्या "आमदार राहुल भाऊ ढिकले"यांचा भक्तां

तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता चिंताजनक : ज‍िल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगडडा
कर्जाच्या ओझ्याखालील महाराष्ट्र !
आघाडी धर्मावरून ‘मविआ’त नाराजीनाट्य !

नाशिक प्रतिनिधी –  शहर , परिसरातील जेष्ठ नागरिक, महिलांचा रामलल्लाच्या दर्शनाचा  योग ज्यांनी  घडवून आणला त्या “आमदार राहुल भाऊ ढिकले”यांचा भक्तांकडून सत्कार करण्यात आला. पंचवटीतील  नवीन आडगाव नाका,  स्वामी नारायण नगर येथे सोहळा घेण्यात आला. 

व्यास पिठावर शहर सरचिटणीस सुनील केदार , कार्यक्रमाचे आयोजक सोमनाथ बोडके  उपस्थीत होते.  सर्व भाविकांचे तुळसीचे रोप देवून सन्मान करण्यात आला.  या वेळी  आ. ढिकले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.तसेच आगामी काळात जास्तीत जास्त नागरिकांना दर्शनाचा लाभ देण्याचा मानस असल्याचे सांगितले. यावेळी यात्रेत आलेले अनुभव भक्तांनी सांगितले.

यात्रेत अतिशय योग्य नियोजन होते , कसलाही त्रास झाला नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे  आयोजन सोमनाथ बोडके यांनी केले होते. यावेळी गिरीश आहेर,विशाल पवार,सुधाकर बडगुजर,भालचंद्र कर्जेकर,विष्णू महाजन,वीणा दिवटे,जयश्री पाटणकर, संतोष कारसुळकर,योगेश पाटणकर, आनंद फुलमामडीकर,अरुण विसपुते, के.अधिकारी, मंजुषा कापडे, सीमा बडगुजर, भिमराव बोडके, सागर भगत, दादा काठे, चंद्रकांत रहाणे, समर्थ बोडके, भावेश भगत, सार्थक बोडके, मंगेश काठे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS