Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बलुतेदारांचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या : आ. नाना पटोले

काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाकडे पहा…इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची जागा काँग्रेस पक्षाच्या नावावर आहे. जितेंद्र पाटील व बाळासाहे

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत धुसपुस; पोकळी भरून काढण्यासाठी राहुल व सम्राट महाडिक यांचे प्रयत्न
युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी चेअरमन पी. एन. जोशी यांचे निधन
मेढ्यातील व्यापार्‍यांकडून फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी

काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाकडे पहा…
इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची जागा काँग्रेस पक्षाच्या नावावर आहे. जितेंद्र पाटील व बाळासाहेब पाटील यांनी लक्ष देवून ते ताब्यात घ्यावे, असे मत भानूदास माळी यांनी व्यक्त केले.

इस्लामपूर / प्रतिनिधी : छ. शिवाजी महाराजांनी बाराबलुतेदारांना घेवून स्वराज्य उभा केले. त्यांचे नाव घ्यायचे सत्ता मिळवायची व त्याच बलुतेदारांवार अन्याय करण्याचे काम हे सरकार करत आहे. छ. शिवाजी महाराजांच्या बारा बलुतेदारांचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केले.
ते इस्लामपूर येथे काँग्रेस ओबीसीच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, ओबीसी अध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, विजय पवार, महिला प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. मनिषा रोटे, रंजना माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पटोले म्हणाले, राज्यात दर दहा वर्षांनी जनगणना होते. सण 2021 ची जनगणना भाजपने केली नाही. जनगणना केल्यास प्रत्येक समाजाची स्थिती समजून येईल. भाजपला आरक्षण संपवायचे आहे. देशातील लोकशाही संपवण्याचे काम भाजप करत आहे. मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन देवून त्यांना खेळवण्याचे काम हे सरकार करत आहे. सध्या या सरकारची वाटचाल खाजकीकरणाकडे सुरू आहे.
भानुदास माळी म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेस ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. ओबीसी समाजाला घटनात्मक आरक्षणाची गरज आहे. आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरेल. नाना पटोले यांनी भाजपच्या विरोधात ओबीसी ताकद उभी केली आहे. राज्यातील बी. सी., ओबीसी समाज एकत्र आला तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल.
विशाल पाटील म्हणाले, नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि सांगली महापालिकेवर काँग्रेसचा महापौर झाला. नाना हे काँग्रेससाठी भाग्यशाली आहे. त्यांनी इस्लामपुरात मेळावा घेतला हे धाडसाचेच काम आहे. या तालुक्यात सण 1999 पर्यंत काँग्रेसचा झेंडा होता. मात्र, त्यानंतर हा पक्ष शिस्तीत संपवण्याचा प्रयत्न केला गेला. या तालुक्यात काँग्रेसवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. मात्र, ते दबावाला घाबरत आहेत. वसंतदादा हे कार्यकर्त्यांची जात विचारत नव्हते. त्यांनी कार्यकर्त्यांना कमीपणा जाणवून दिला नाही. देश वाचवायचा असेल तर काँग्रेसला निवडून आणावे लागेल.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, राज्यात काँग्रेसला नाना पटोले यांच्या रूपाने आक्रमक नेता मिळाला आहे. त्यामुळे ओबीसी नेतृत्वाची पोकळी भरून निघाली आहे. ओबीसी बद्दल भाजपचे प्रेम असते तर समाजाचे मागासलेपण दर्शवणारा डाटा लपवून ठेवला असता का? हा प्रश्‍न उपस्थित केला.
नंदकुमार कुंभार म्हणाले, तालुक्यात वसंतदादांवर प्रेम करणारी लोक आहेत. परंतू दबावामुळे बाहेर पडत नाहीत. त्यांना ताकद देण्याची गरज आहे. नाना पाटोले सारखा नेता लाभल्याने ओबीसी समाज काँग्रेसकडे वळला आहे. देशात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी हा समाज महत्वपुर्ण भुमिका बजावेल.
यावेळी जितेंद्र पाटील, आशिष कोरी,करिम मिस्त्री, सुभाष खोत यांची भाषणे झाली. कार्यक्रमास शाकीर तांबोळी, अजित भांबुरे, अ‍ॅड. विजय खरात, संदिप मोहिते, संदीप परीट, विनायक तांदळे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. सलमान आवटी यांनी आभार मानले.


हे कितपत योग्य…
राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेंव्हा प्रेदशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील हे ढसाढसा रडले. मात्र, त्यावेळी अवतीभोवती सहकारी हसत होते. आ. जयंत पाटील यांच्या सारखा सुसंस्कृत नेता रडत असताना त्यांच्या सहकार्‍यांनी हसून अपमान करणे हे कितपत योग्य असे ही भानुदास माळी म्हणाले.

COMMENTS