Homeताज्या बातम्यादेश

अधीक्षक अभियंता छाया नाईक यांचा भ्रष्टाचाराचा विक्रम

सा.बां.रत्नागिरी मंडळात असतांना संगनमताने केला कोट्यावधींचा गैरव्यवहारमुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी मंडळाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता श्र

हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री यमाईदेवीचा रथोत्सव
Beed : भर पावसाळ्यात बोबडेवाडी नागरिकांची पाण्यासाठी भटकंती !
पोलिस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणार्‍यांवर गुन्हा

सा.बां.रत्नागिरी मंडळात असतांना संगनमताने केला कोट्यावधींचा गैरव्यवहार
मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी मंडळाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक यांनी या विभागात कोट्यावधींचा गैरव्यवहार विविध अधिकार्‍यांच्या संगनमताने केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात नेमका त्यांच्यावर कुणाचा कृपाशिर्वाद होता, याची चर्चा होत आहे.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कार्यरत असतांना हा भ्रष्टाचार झाला आहे. श्रीमती छाया नाईक यांनी अधीक्षक अभियंता असतांना तीन वर्षांमध्ये अनियमित कामे केली. नियमबाह्य कामांचा धडाका लावत त्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. त्यासंदर्भातील तक्रारी राज्य सरकारकडे, जीएसटी कार्यालयाकडे आणि आयकर विभागाकडे, तसेच लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे प्रलंबित आहेत. या संपूर्ण तक्रारीची दखल घेऊन राज्य सरकारने गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची गरज होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे श्रीमती छाया नाईक यांना नेमका कुणाचा कृपाशिर्वाद आहे, अशी चर्चा जोर धरतांना दिसून येत आहे. राज्य कर उपायुक्त वस्तू व सेवा विभाग रत्नागिरी, यांच्याकडे देखील यासंदर्भात तक्रार केली आहे. या तक्रारीत तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक, विद्यमान अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी तिथे आहेत. यासोबतच कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, लेखापाल अनिलकुमार शर्मा, उपअभियंता, सा.बां. उपविभाग क्रमांक 1 रत्नागिरी जनक हरीदास धोत्रेकर, उपअभियंता प्रमोद विठ्ठल भारती, उपअभियंता पूजा राजेंद्र इंगवले, कनिष्ठ अभियंता अ.बी. पवळ या अधिकार्‍यांविरोधात ही तक्रार दाखल असून, या तक्रारीत संबंधित पुरावे देखील दिले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषी अधिकार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
श्रीमती छाया नाईक यांच्यासंदर्भात रत्नागिरी विभाग, तसेच राज्य सरकारकडे विविध तक्रारी प्रलंबित आहेत, त्या तक्रारीचा धांडोळा नन्यानेच रूजू होणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी घेण्याची गरज आहे. यापूर्वी या विभागाच्या कर्तव्यदक्ष अतिरिक्त प्रधान सचिव या मनीषाताई म्हैसकर या होत्या, त्यांनी या विभागाला एक शिस्त लावत भ्रष्टाचाराला वेसन घातले होते, तेच काम मिलिंद म्हैसकर यांच्या हातून घडो आणि या भ्रष्ट अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, याची आमची अपेक्षा.

उद्यापासून मुंबई शहर इलाखा, मध्य, उत्तर आणि एकात्मिक घटक विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश
सार्वजनिक बांधकाम मुंबई शहर इलाखा विभाग, वरळी मध्य मुंबई विभाग, अंधेरी उत्तर मुंबई विभाग, एकात्मिक घटक मुंबई या विभागातील शाखा अभियंता आणि उपअभियंता यांनी भ्रष्टाचाराचा धुडगूस घातला आहे. या विभागातील शाखा अभियंत्यांनी काही ठेकेदारांना आपल्या गावांकडून आणले असून त्यांनी संगनमताने भ्रष्टाचार चालवता असतांनाच दुसरीकडे याच विभागातील उप अभियंत्यांनी देखील आपल्याच मुलांच्या-नातेवाईंकांच्या नावांवर एमओडब्ल्यू देण्यात आले आहे. या संपूर्ण भ्रष्टाचाराचा पर्दाफाश उद्यापासून दैनिक लोकमंथन आणि लोकमंथन न्यूज 24 चॅनेलवर.

COMMENTS